बिग बॉस मराठी सिझन 2 | मी गप्प वैगरे नाही बसत – अभिजीत बिचुकले

Bigg Boss Marathi 2 Bichukle Fights With Neha
बिग बॉस मराठी सिझन 2 | मी गप्प वैगरे नाही बसत – अभिजीत बिचुकले

“नेहा आणि बिचुकलेंमध्ये वाद !”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकले नेहेमीच चर्चेचा विषय असतात. आज अभिजीत बिचुकले नेहाला जाब विचारणार आहेत. बिचुकले यांचे म्हणणे आहे नेहा असे म्हणाली त्या व्यक्तीच्या आईला तुम्ही उलट बोललात आता हा मुद्दा आहे का ? तो तिसरा व्यक्ति आता खेळामध्ये देखील नाहीये, तर त्या व्यक्तीचे आणि नेहाचे असे बोलणे झाले होते का बाहेर जाण्याच्या आधी की एवढ्या आठवड्याने बिचुकले परत आल्यावर हे सगळे बोलायचे ? बिचुकलेंचे म्हणणे आहे, गडे मुर्दे मत निकालो… पुढे ते म्हणाले आता मी उदाहरण देऊन सांगेन की, तू उलटा गेम करू नकोस … त्यावर नेहाचा आवाज देखील चढला, आता गप्प बसायच मी बोलेपर्यंत त्यावर बिचुकले म्हणाले “मी गप्प वैगरे नाही बसत, मी माझ्या बापाचं पण ऐकत नाही… आणि वाद पुढे वाढतच गेला… कोण आहे ती व्यक्ति ? नेहा काय बोल्ली बिचुकलेंना ? नक्की कशावरुन वाद झाला ? हे आजच्या भागामध्ये कळेलच… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

तर शिव आणि वीणाच घरामध्ये एक वेगळच विश्व तयार झाले आहे… शिव आणि वीणाची मज्जा मस्ती सुरू असते… आज शिव वीणाला उडी मारायला शिकवणार आहे आणि त्यामध्ये वीणा आज बिग बॉस आणि शिवच्या आईला सांगणार आहे  बघा काय करतोय ?