बिग बॉस मराठी सिझन 2 | वीणा – आरोहमध्ये का झाले भांडण ?

Veena And Aroh Fight Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठी सिझन 2 | वीणा - आरोहमध्ये का झाले भांडण ?


““हा ऎटीट्यूड घरी ठेव” – आरोह”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणांवरून भांडण होतच असतात… कोणीच कोणाचे ऐकायला तयार नसते. शब्दाला शब्द वाढत जातो आणि त्याबरोबर वाद देखील विकोपाला पोहचतो. आज वीणा आणि आरोहमध्ये वादावादी होणार आहे… वीणाने हीनाला असे म्हंटले की, आरोहला सगळ्यांपासून प्रॉब्लेम आहे. आणि याचाच जाब आरोह वीणाला विचारणार आहे… त्यावर वीणाने असे हीनाला सांगितल्याचे कबूल देखील केले आणि ती असे का म्हणाली याचे स्पष्टीकरण देखील दिले की तुला सगळ्याच बाबतीत issue असतो, तुला अनावश्यक गोष्टीचा त्रास होतो…. त्यावर आरोहचे म्हणणे आहे तू कोण ठरवणारी कोणती गोष्ट आवश्यक आहे आहे कोणती नाही… त्यावर वीणा म्हणाली तू कोण ठरवणारा मी काय करणार आणि काय नाही ? आणि वाद वाढतच गेला… वीणाने सांगितले या घरामध्ये तू नाही ठरवणार मी काय करायचे आणि मी नाही ठरवणार तू काय करायचे … वीणाचे अश्याप्रकारे बोलणे आरोहला आवडले नाही तो तिला म्हणाला हा ऎटीट्यूड घरी ठेव…

कोणत्या मुद्दयावरुन वीणाआरोहमध्ये वाद सुरू झाला ? वीणाने आरोहला कोणता टोंमणा मारला ? आजच्या भागामध्ये कळेलच… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2  आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.