बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८६ | कोण असेल फिनालेमध्ये पोहचणारा पहिला सदस्य ?

Bigg Boss Marathi 2 Ticket To Finale
बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८६ ! कोण असेल फिनालेमध्ये पोहचणारा पहिला सदस्य ?

बिग बॉस मराठीच्या घरात काल जुने सदस्य परत आल्याने सगळेच खूप भाऊक झाले… घरामध्ये आलेल्या सदस्यांना जुन्या आठवणी आठवल्या… या घरामध्ये आलेल्या सदस्यांवर बिग बॉस यांनी एक महत्वपूर्ण कार्य सोपवले आहे… बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरलेल्या पाच सदस्यांपैकी त्यांना वाटणार्‍या कोणत्याही दोन सदस्यांना वाचावायचे आहे… हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. घरामध्ये आलेल्या सदस्यांना त्यांच्या मते सर्वोत्तम असणार्‍या दोन सदस्यांची नावे द्यायची आहेत… विद्याधर जोशी, दिगंबर नाईक, माधव देवचके, सुरेखा पुणेकर यांनी शिवानी आणि नेहा या दोन सदस्यांची नावे घेतली तर वैशाली म्हाडेने शिव आणि नेहा तर मैथिली जावकर हिने शिव आणि वीणा यांची नावे घेतली…

आज घरामध्ये अभिजीत केळकर, रूपाली भोसले, हीना पांचाळ येणार असून हे सदस्य कोणत्या दोन सदस्यांची नावे घेतील हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे… तसेच आज बिग बॉस घोषणा देखील करणार आहेत नऊ पैकी आठ मत मिळवून बिग बॉस मराठी सिझन 2 च्या फिनालेमध्ये पोहचणार्‍या पहिल्या सदस्याचे नाव काय आहे… तेंव्हा जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 चा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi 2 Ticket To FinaleBigg Boss Marathi 2 Ticket To FinaleBigg Boss Marathi 2 Ticket To FinaleBigg Boss Marathi 2 Ticket To Finale

Bigg Boss Marathi 2 Ticket To Finale
बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८६ !
कोण असेल फिनालेमध्ये पोहचणारा पहिला सदस्य ?