बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ९३ ! सदस्यांसाठी आजचा दिवस ठरणार खास…

Bigg Boss Marathi Season 2 Day 93
बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ९३ ! सदस्यांसाठी आजचा दिवस ठरणार खास...

बिग बॉस मराठीचा सिझन दुसरा पहिल्या दिवसापासून चर्चेमध्ये आहे मग ते टास्क असो घरातील सदस्यांची भांडण असो वा मैत्री असो… घरामध्ये आलेल्या सदस्यांपैकी ६ सदस्य आता फिनालेमध्ये पोहचले आहेत. आणि आता तो क्षण जवळ आला आहे ज्या दिवसाचे स्वप्न सदस्यांनी घरामध्ये आल्यापासून पाहिले… आजचा दिवस सदस्यांसाठी खास ठरणार आहे… कारण आज बिग बॉस सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाची AV दाखवणार आहेत… यामुळे सदस्य भावूक होणार हे निश्चित…

साहसी, जिगरबाज, लढवय्या अशा विशेषणांनी ओळखली गेलेली व्यक्ति म्हणजे शिव ठाकरे या शब्दांत बिग बॉस यांनी शिवचे कौतुक केले. बिग बॉसच्या घरात प्रथम प्रवेश केला एका ग्लॅमरस, उत्तम अभिनेत्रीने… ती संवेदनशील, हरहुन्नरी व्यक्ति म्हणजेच किशोरी शहाणे… किशोरी शहाणे यांच्या प्रवासाबद्दल बिग बॉस बोलत असताना किशोरी ताईंच्या डोळ्यात पाणी तरळले… “मूर्ति लहान पण कीर्ती महान” ही म्हण कोणाला लागू पडत असेल तर तो नेहा शितोळे… नेहाला देखील आज तिचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास बघायला मिळणार आहे… तिघेही सदस्य या दरम्यान खूप भावुक झाले, त्यांचा इतक्या दिवसांचा प्रवास त्यांच्या नजरेसमोरून गेला…

बघूया पुढे काय झाले आजच्या बिग बॉस मराठी सिझन 2 च्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.