बिग बॉस मराठी सिझन 2 – सदस्य करणार स्वत:चं मूल्यांकन…

Bigg Boss Marathi Season 2 Day 87
बिग बॉस मराठी सिझन 2 – सदस्य करणार स्वत:चं मूल्यांकन…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सदस्य स्वत:च मूल्यांकन ठरवणार आहेत… या टास्कमध्ये किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांनी स्वत:चे मूल्यांकन ६ लाख ठरवले यावर घरातील सदस्य संमती दर्शवतील की नाही हे आजच्या भागामध्ये कळेलच… मुद्रांवर सहा लाख, पाच लाख, साडेचार लाख, चार लाख, साडेतीन लाख, दोन लाख अशी किंमत लिहिलेली आहे… शिवानी सुर्वेवर ही संधी येताच तिने स्वत:ची घरातील किंमत २ लाख अशी ठरवली… आणि त्यावर तिने स्पष्टीकरण दिले. शिवानीचे म्हणणे होते, “आधी ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्यासाठी मी ही किंमत ठरवली आहे… कारण जर मी त्या चुका केल्या नसत्या किंवा चुका नाही म्हणणार मी त्याला माझा राग, अग्रेशन म्हणेन… मी जर ते कमी केले असते तर मी कदाचित योग्य ठरले असते सहा लाख म्हणायला… पण मला आता ते योग्य नाही वाटत म्हणून मी सगळ्यात कमी किंमत सांगते आहे. मला अस वाटत मी परत आल्यानंतर मी माझ्या वागणुकीमध्ये योग्य त्या बाबींमध्ये बदल घडवून आणला आहे”…

आता बघूया इतर सदस्य कोणती रक्कम ठरवतील ? आणि टास्कमध्ये पुढे काय होईल ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.