“महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि ‘मोलकरीण बाई’च्या टीमच्या उपस्थितीत रंगला एक टप्पा आऊटचा महाअंतिम सोहळा”
‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. संपूर्ण महाराष्ट्रातून विनोदवीरांचा शोध घेतल्यानंतर सहा स्पर्धकांची अंतिम सोहळ्यासाठी निवड करण्यात आलीय. या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. महाअंतिम सोहळ्याची चुरस रंगणार आहे लातूर पॅटर्न बालाजी, नालासोपाऱ्याचा बंटाय केतन, मुंबई लोकल रोहित, अमरावतीचा करामती प्रविण, मालाडचा गोरेगावकर अनिश आणि बडे नामवाला श्रीवल्लभ या सहा स्पर्धकांमध्ये. या सहा स्पर्धकांनी महाअंतिम सोहळ्यासाठी जोरदार तयारी केलीय. त्यामुळे ‘एक टप्पा आऊट’चं महाविजेतेपद कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सहा स्पर्धकांसोबतच रेशम टिपणीस, आरती सोळंकी आणि विजय पटवर्धन या तिनही मेंटॉर्समध्येही ही चुरस रंगणार आहे. कारण या तिघांचेही स्पर्धक ग्रॅण्ड फिनालेमध्ये परफॉर्म करणार आहेत.
खास बात म्हणजे महेश कोठारे, हर्षदा खानविलकर आणि ‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. तेव्हा हा दिमाखदार सोहळा पाहायला विसरु नका २३, २४ आणि २५ ऑगस्टला रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Mahesh Kothare Mahesh Kothare Harshada Khanvilkar & Abhijeet Chavhan Harshada Khanvilkar & Abhijeet Chavhan कोण ठरणार ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता ?