स्टेशन मास्टर सलमान खान बिग बॉसच्या प्रवासाचा वेग वाढविणार

Bigg Boss New Season To Start Soon
स्टेशन मास्टर सलमान खान बिग बॉसच्या प्रवासाचा वेग वाढविणार
Click here to read this post in English.

कृपया इकडे लक्ष द्या ! बिग बॉस प्रवासाला सुरूवात करण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि धक्के, आश्चर्ये आणि नाट्ये भरलेल्या रपेटीवर तुम्हाला घेऊन जाणार आहे. या रोमांचक प्रवासाची सुरूवात सलमान खान करणार असून, स्पर्धकांना त्यांचे कौशल्य दाखवावे लागणार आहे कारण आधीपेक्षा ठिकाण जवळ असणार आहे. बिग बॉसच्या नवीन सीझन मध्ये सर्व सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे, आणि त्या पंच मुळे सुरूवातीपासूनच सीझनचा मनोरंजनाचा बार उंचावला जाणार आहे.   

शोच्या राज्यकर्त्या होस्ट सलमान खानने नुकताच एक प्रोमो शूट केला आहे ज्यात तो स्टेशन मास्टराच्या वेशात आहे आणि नवीन सीझनची घोषणा करत आहे. केबिन मध्ये बसलेल्या रेल्वेच्या हादऱ्यांनी हलणारा सलमान नवीन सीझनची संकल्पना आणि अपेक्षेप्रमाणे तो वेगवान शो कसा बनणार आहे हे स्पष्ट करताना दिसणार आहे. स्टेशन मास्टराचा वेश आणि टोपी परिधान करून सलमानने प्रोमो मध्ये स्वतःचा तडका घातला आहे त्यामुळे तो गंमतीदार आणि बहुत तेढा बनला आहे.  

बिग बॉसचा नवीन सीझन आता सुरू होत असून, तुमचे सुरक्षा बेल्ट बांधून बसा आणि मनोरंजनाच्या रपेटीचा आनंद घ्या.

बिग बॉस सुरू होणार आहे लवकरच कलर्स वर!

Bigg Boss New Season To Start Soon
स्टेशन मास्टर सलमान खान बिग बॉसच्या प्रवासाचा वेग वाढविणार