Home Featured मनोज आणि निकिता शिंगुस्तेंचं स्पायसी किक म्हणजे रुचकर खाद्यभ्रमंती ते यशाचा दरवळ!

मनोज आणि निकिता शिंगुस्तेंचं स्पायसी किक म्हणजे रुचकर खाद्यभ्रमंती ते यशाचा दरवळ!

Manoj Shinguste SpickyKick Perfumes

फूड व्लॉगिंगमधून घराघरांत पोहोचलेले जोडपे मनोज शिंगुस्ते आणि निकिता शिंगुस्ते आता SPICYKICK Perfumes या नव्या ब्रँडच्या माध्यमातून सुगंधाच्या दुनियेत दाखल झाले आहेत. मनोज यांचा आर्थिक क्षेत्रातील नोकरी ते डिजिटल विश्व आणि आता स्वतःचा परफ्यूम ब्रँड, असा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

माणसाच्या ठायी जिद्द असली की त्याच्या यशाचा दरवळ सर्वत्र पसरतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज शिंगुस्ते! ‘स्पायसी किक’ या प्रसिद्ध फूड व्लॉगिंग चॅनलमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले मनोज आता सगळ्यांसाठी SPICYKICK Perfumes ही सुगंधी पर्वणी घेऊन आले आहेत. खाद्यपदार्थांची रुचकर सफर घडवणाऱ्या स्पायसी किकचा हा नवा प्रवास आता सुगंधाच्या दुनियेत पोहोचला आहे.Manoj Shinguste & Nikita Shinde Spicy Kickबदलत्या काळाची गरज ओळखून त्या दिशेने मार्गक्रमण करणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यासाठी वेगळंच धाडस लागतं आणि हे धाडस मनोज यांनी दाखवलं. आर्थिक क्षेत्रातील नोकरी सोडून त्यांनी कंटेंट क्रिएशनसारख्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर आपल्या बोलीभाषेत खाद्यभ्रमंतीचे, म्हणजेच फूड व्लॉगिंगचे अनेक व्हिडिओ तयार करत त्यांनी डिजिटल विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या सगळ्यात त्यांना खंबीर साथ दिली ती म्हणजे त्यांची पत्नी निकिता शिंगुस्ते यांनी. Spicy Kick हे यूट्यूब चॅनल चालवताना त्यात लागेल तशी पूर्ण साथ देत त्यांनी मनोज यांच्या सगळ्या व्हिडिओंना वेगळीच बहार आणली, कधी कॅमेऱ्याच्या मागे राहून तर कधी व्हिडिओ मध्ये दिसत. त्या दोघांनी एकत्रितपणे केलेल्या या मेहनतीमुळे हे चॅनल बघता बघता व्हायरल झाले आणि सगळ्या प्रेक्षकांनी ते आपलेसे करून घेतले. आता मनोज यांच्या या नवीन प्रवासात म्हणजेच Spicy Kick परफ्यूम ब्रँड मध्येही निकिता यांचा मोलाचा वाटा आहे.

Manoj Shinguste and Nikita Shinguste

त्यांच्या व्हिडिओंचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातला सहजपणा आणि आपल्या माणसांशी जोडून घेणारी भाषा. वेगवेगळ्या ठिकाणच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देताना त्यांनी आपल्या बोलीभाषेचा गोडवा जपला. जेवण हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांच्या व्हिडिओंशी, मनोज आणि निकिता शिंगुस्ते यांच्याशी आणि पर्यायाने स्पायसी किकशी अनेक लोक जोडले गेले. आपल्या बोलीभाषेच्या गोडव्यामुळे त्यांनी खाद्यभ्रमंतीचे हे व्हिडिओसुद्धा अधिक रुचकर केले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Manoj Shinguste SPICYKICK

स्पायसी किकच्या लोकप्रियतेतून व्यवसायाची नवी वाट

मनोज शिंगुस्ते हे ‘स्पायसीकिक’ या नावाने ओळखले जातात. कॉमेडी, फूड, लाइफस्टाइल आणि मनोरंजन अशा विविध विषयांवरील कंटेंटच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या एकत्रित फॉलोअर्सची संख्या सुमारे १७ लाख आहे.

सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवणं ही एक गोष्ट; पण त्या लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभारणं ही वेगळीच गोष्ट आहे. मनोज यांनी आता SPICYKICK Perfumes हा स्वतःचा परफ्यूम ब्रँड सुरू करून याच दिशेने पाऊल टाकलं आहे. SpicyKick Rudra Perfume

कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांची आवड समजून घेतली, त्यांच्याशी संवाद साधला आणि स्वतःच्या ब्रँडची ओळख निर्माण केली. आता याच अनुभवाचा उपयोग परफ्यूम व्यवसायाच्या वाढीसाठी करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे. डिजिटल माध्यमांवर तयार झालेलं प्रेक्षकांशी नातं हे कोणत्याही नव्या ब्रँडसाठी महत्त्वाचं ठरू शकतं.

SPICYKICK Perfumes मध्ये सुगंधांची खास मेजवानी SpicyKick Kubera Perfume

खाद्यपदार्थांची चव आणि सुगंध यांचं नातं जितकं खास, तितकाच परफ्यूमच्या दुनियेत सुगंधाला स्वतःचं महत्त्व आहे. प्रत्येकाची आवड वेगळी असते आणि त्या आवडीनुसार परफ्यूम निवडणारेही अनेक जण असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन SPICYKICK Perfumes च्या माध्यमातून विविध फ्रेग्रन्सचे पर्याय ग्राहकांसमोर ठेवण्यात आले आहेत. SpicyKick Blue Rush Perfume

या ब्रँडच्या कलेक्शनमध्ये Kubera, Rudra, Blue Rush आणि Smooth Oud Elite या परफ्यूम्सचा समावेश आहे. वेगवेगळ्या सुगंधांची आवड असलेल्या ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार पर्याय निवडता यावा, हा या कलेक्शनचा महत्त्वाचा भाग आहे.

या परफ्यूम्सची माहिती, उपलब्ध पर्याय आणि खरेदीसंबंधी तपशील ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येतील. त्यासाठी “spicykickperfumes.com” (https://spicykickperfumes.com) या वेबसाइटला भेट देता येईल.

खाद्यभ्रमंतीपासून सुगंधाच्या दुनियेपर्यंत…

मनोज यांचा हा प्रवास पाहताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपल्या कामाची आवड आणि त्यातून निर्माण झालेल्या संधींचा उपयोग करण्याची तयारी. आर्थिक क्षेत्रातील नोकरीपासून सुरुवात करून कंटेंट क्रिएशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणं आणि त्यानंतर स्वतःचा परफ्यूम ब्रँड सुरू करणं, हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. SpicyKick Out Elite Perfume

आज सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही. अनेक क्रिएटर्ससाठी ते स्वतःचे व्यवसाय उभारण्याचं आणि आपली उत्पादनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बनलं आहे. मात्र, केवळ लोकप्रियतेच्या जोरावर व्यवसाय उभा राहत नाही. ग्राहकांचा विश्वास, उत्पादनांचा दर्जा, योग्य मार्केटिंग आणि सातत्यपूर्ण प्रयत्न या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.

Manoj Shinguste

मनोज शिंगुस्ते यांनी आपल्या डिजिटल प्रवासातून मिळवलेला अनुभव आता व्यवसायासाठी वापरण्याचा प्रयत्न केला आहे. SPICYKICK Perfumes च्या माध्यमातून त्यांना ग्राहकांशी नव्या प्रकारे जोडण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या या नव्या उपक्रमाला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि परफ्यूमच्या बाजारपेठेत हा ब्रँड स्वतःचं स्थान कसं निर्माण करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

एकेकाळी खाद्यपदार्थांची चव आणि त्यामागच्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा स्पायसी किक आता सुगंधांची दुनिया अनुभवण्याची संधी घेऊन आला आहे. रुचकर खाद्यभ्रमंतीपासून सुरू झालेला हा प्रवास आता यशाच्या नव्या दरवळाकडे वळला आहे. मनोज शिंगुस्ते आणि निकिता शिंगुस्ते यांच्या या नव्या व्यावसायिक वाटचालीसाठी पुढील प्रवास नक्कीच उत्सुकतेचा ठरणार आहे.

 

Manoj Shinguste SpickyKick Perfumes

Keywords : Manoj Shinguste, Nikita Shinguste, Spicy Kick, SpicyKick, Spicy Kick Perfumes, SpicyKick Perfumes, YouTuber, Entrepreneur, Luxury Perfumes, Perfumes, स्पायसी किक परफ्यूम, मराठी कंटेंट क्रिएटर, मनोज शिंगुस्ते परफ्यूम ब्रँड