बिग बॉस मराठी सिझन २ – शिव कि रुपाली कोणाला नापास करायचं यावरून नेहा आणि टीममध्ये वाद

Bigg Boss Marathi Season 2 Day 18 Neha Fights With Housemates

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असलेल्या शाळा सुटली पाटी फुटली या टास्कमध्ये प्रत्येक टीमने विद्यार्थी झालेल्या सदस्यांना नापास करायचे आहे… आणि यावरून नेहा, शिवानी, अभिजित केळकर, माधव देवचक्के, दिंगबर नाईक, विद्याधर जोशी, अभिजीत बिचुकले यांच्यामध्ये मतभेद झालेले दिसणार आहेत… दुसऱ्या टीममधील कोणत्या सदस्याला नापास करायचे हे टीमला सर्वानुमते ठरवायचे आहे… नेहाच्या म्हणण्यानुसार तिला रुपालीला नापास करायचे आहे परंतु अभिजीत केळकरचे असे म्हणणे आहे, कि माझ्याकडे रूपालीला नापास करायला काही कारण नाहीये… तर माधव, दिगंबर, विद्याधर आणि अभिजीत बिचुकले, केळकर यांचे म्हणणे पडले शिव काहीच करत नाहीये त्यामुळे शिवला नापास करायला हवे… यावर नेहाने नाराजगी व्यक्त केली “सगळेच जण हत्यार टाकून बसून जातात, बोलायची वेळ येते तेंव्हा”…

 

आता पुढे या टास्क मध्ये काय होईल ? शिक्षक बनलेले सदस्य कोणाला नापास करतील ? कोणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगेल ? आणि कोण घराचा कॅप्टन बनेल ? हे बघणे रंजक असणार आहे… तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi Season 2 Day 18 Neha Fights With HousematesBigg Boss Marathi Season 2 Day 18 Neha Fights With Housemates