सोनी मराठीवर येत्या २३ जूनला रंगणार ‘५६वा मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळा’

56th Maharashtra State Awards
सोनी मराठीवर येत्या २३ जूनला रंगणार '५६वा मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळा'

आपल्या कलाकृतीचा, अभिनयाचा तसेच मेहनतीचा नेहमीच गौरव केला जावा असे स्वप्न सिनेसृष्टीत काम करणा-या प्रत्येक कलाकाराचं असतं. आणि तो गौरव जर भारतीय सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणा-या ‘मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळ्यात’ होणार असेल तर त्याची बात काही निराळीच असते.  कलाकारांचा आणि त्यांच्या कलाकृतीला गौरव करण्यात आलेला  ‘५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोह‍ळा’ दिमाखदार पद्धतीने नुकताच मुंबईत पार पडला आणि आता हा सोहळा सोनी मराठीवर येत्या २३ जूनला दुपारी वाजता आणि सायंकाळी वाजता रंगणार आहे.

ऑस्करविषयी असलेले अप्रुप आणि मान हा प्रत्येकाला नव्याने सांगायला नको. प्रत्येक व्यक्तीला,  कलाकाराला ऑस्करविषयी आदर आहे आणि ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली मराठी मंचावर उपस्थित राहणे ही गौरवाची बाब आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने सोनी मराठीवर पहिल्यांदाच जॉन बेली यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आणि आदी मान्यवर उपस्थित होते. जॉन बेली यांनी या मराठमोळ्या कार्यक्रमात आपल्या काय भावना व्यक्त केल्या हे प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळणार आहे.

कोणत्या कलाकृतीला, कलाकाराला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकामध्येच असते. तसेच, या मंचावर रंगलेले कलाकारांचे,  सोनी मराठी कुटुंबातील कलाकारांचे धमाकेदार, अफलातून परफॉर्मन्स ज्यामुळे या सोहळ्याला चार चाँद लागले ते देखील पाहायला मिळणार आहेत.  तर अभिमानाच्या क्षणांनी आणि सुंदर नृत्य सादरीकरणांनी परिपूर्ण असा हा  ५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळापाहा येत्या २३ जूनला दुपारी वाजता आणि सायंकाळी वाजता फक्त सोनी मराठीवर.

 

56th Maharashtra State Awards56th Maharashtra State Awards56th Maharashtra State Awards

56th Maharashtra State Awards
सोनी मराठीवर येत्या २३ जूनला रंगणार ‘५६वा मराठी चित्रपट पुरस्कार सोह‍ळा’