नवी मालिका “निवेदिता माझी ताई” लवकरच सोनी मराठी वाहिनीवर

निवेदिता माझी ताई

नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला !

सोनी मराठी वाहिनी नेहमीच निरनिराळ्या विषयांच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आता या मनोरंजनाच्या पेटाऱ्यातून आणखी एक नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. “निवेदिता माझी ताई” असे या मालिकेचे नाव असून या मालिकेतून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अशोक फळदेसाई आणि एतशा संझगिरी ही जोडी या नव्या मालिकेतून आपल्या भेटीस येते आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अशोक आणि एतशा यांनी या आधीच्या मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चांगलीच छाप पाडली आहे. आता नव्या मालिकेतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन कशा प्रकारे करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. यशोधन आणि निवेदिता ही त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे आहेत. पण या मालिकेत त्या दोघांबरोबर एक लहानगा मुलगा दिसणार आहे. रुद्रांश चोंडेकर असे त्याचे नाव असून तो असीम या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. असीम हा निवेदिताचा लहान भाऊ. आता निवेदिता आणि यशोधन यांची जोडी छोट्या पडद्यावर किती रंगत आणते, हे आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल.

सोनी मराठी वाहिनी नेहमीच रंगतदार विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येते. “निवेदिता माझी ताई” या मालिकेचा विषयही तितकाच आगळावेगळा आहे. अभिनेता अशोक फळदेसाई आपल्या प्रॉमिसिंग अभिनयासाठी नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. तसेच एतशा संझगिरीनेही या आधी काही मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे आणि आता या मालिकेत दोघेही नव्या व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतील. मालिकेची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. निवेदिता आणि यशोधन यांच्या नव्या वेषभूषेची चर्चा नक्कीच रंगणार आहे. भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची गोड गोष्ट सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. आता असीम आणि निवेदिता या भावा-बहिणीचे अनोखे नाते कशा प्रकारचे असेल हे मालिकेतच आपल्याला पाहायला मिळेल. मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहे. पाहायला विसरू नका “निवेदिता माझी ताई” लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

निवेदिता माझी ताई