बिग बॉस मराठी सिझन 2 – “त्यामुळे माधव बाहेर गेला नेहा” – शिवानी

Bigg Boss Marathi 2 Neha Shivani Fight
बिग बॉस मराठी सिझन 2 – “त्यामुळे माधव बाहेर गेला नेहा” - शिवानी

“नेहा आणि शिवानीच्या वादा मागचे काय आहे कारण ?”

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज नाती बदलताना दिसतात… मित्र कधी वैरी होईल हे सांगता येत नाही… कधी कुठली गोष्ट खटकेल ? कोणत्या बोलण्याचे वाईट वाटेल आणि दुखवला जाईल ? गैरसमज होईल ? हे सांगता येत नाही…काही दिवसाआधी शिवानीने नेहाशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता… जितक काम असेल तितकच बोलायचे जी मैत्री असेल ती बाहेर निभवायची या घरामध्ये नाही.. पण, अचानक माधवच्या घरामधून जाण्याने दोघींना खूप मोठा धक्का बसला आणि त्यांनी ठरवले आता भांडायचे नाही, आपण दोघीच आहोत एकमेकांना आणि बरच काही पण आता मात्र पुन्हा एकदा या दोघींमधील मैत्री तुटते की काय असे वाटत आहे… नेहा असे काय बोलली शिवानीला ज्याचा शिवानीला खूप राग आला… यावेळेस शिवानीने अनेक गोष्टी नेहाला बोलून दाखावल्या, तिला खटकणार्‍या न पटणार्‍या ज्या गोष्टींच तिला राग येतो त्या सगळ्या…

शिवानी म्हणाली, जसा तिला राग येतो तसा दुसर्‍यांना देखील राग येतो… तिला एका विशिष्ट पध्दतीने कोणी बोलल की त्रास होतो… सगळ्यांसमोर तू मला असे नाही बोलू शकत नेहा… त्यावर किशोरी ताई म्हणाल्या तुम्हा दोघींच्या मैत्रीची आता मी मिसाल देत होते… त्यावर शिवानी म्हणाली काही गरज नाही… नेहाचे म्हणणे होते मला काही फरक पडत नाही मी हजार वेळा जाईन तिच्याशी बोलायला नंतर सुद्धा… त्यावर शिवानी म्हणाली, अजिबात यायची गरज नाही, याने लोकांना दाखवशील की बघा मी किती चांगली आहे… हेच केलस तू माधवच्या बाबतीत. नेहाचे म्हणणे पडले मला यावरती काहीच बोलायचे नाही… आणि शिवानीनेहा मधील वाद वाढतच गेला… शिवानी म्हणाली की, तुझ्याकडे बोलायला काही नाहीये… त्यावर नेहाचा आवाज चढला आणि ती म्हणाली “मला माहिती आहे मी काय केल आहे माझ्या आणि माधव बद्दल तू काही बोलू नकोस. यावर शिवानी म्हणाली, म्हणून तो बाहेर गेला सारखं बोलायला लावल तू त्याला… रडायच नाटक केलस, मलाच तुम्ही किती बोलता, माझच कसं खरं आहे, मी किती बिचारी आहे, किती बोलतो मला माधव हे चित्र तू बनवलंस नेहा… हा वाद कुठवर जाईल ? यावर नेहाचे म्हणणे काय असेल ?

जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Bigg Boss Marathi 2 Neha Shivani Fight

Bigg Boss Marathi 2 Neha Shivani Fight
बिग बॉस मराठी सिझन 2 – “त्यामुळे माधव बाहेर गेला नेहा” – शिवानी