Home Entertainment या आषाढी एकादशीला अंत होणार कलीचा आणि जन्म दत्त गुरुंचा

या आषाढी एकादशीला अंत होणार कलीचा आणि जन्म दत्त गुरुंचा

VithuMauli and Shree Gurudev Datta
या आषाढी एकादशीला अंत होणार कलीचा आणि जन्म दत्त गुरुंचा

“स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकांचे आषाढी विशेष भाग”

आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्या मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून प्रेक्षकांना विठ्ठलाचं दर्शन घरबसल्या घेता येतं. आषाढी एकादशीला प्रसारित होणाऱ्या विठुमाऊलीच्या विशेष भागात पुंडलिक आणि विठ्ठलाच्या भक्तीचा नयनरम्य सोहळा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पुंडलिकाने १२ बलुतेदारांच्या मदतीने बांधलेलं मंदिर पूर्णत्वास गेलं आहे. कलीयुगातलं सर्वश्रेष्ठ मंदिर पुंडलिकाने उभं केलंय. तिन्ही लोकांत ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली गेली तो क्षण अखेर जवळ आला आहे. या मंदिरात विठ्ठल – रुक्मिणीने प्रवेश करावा अशी पुंडलिकाची इच्छा आहे. विठ्ठलाची साथ २८ युगं अखंड सोबत रहावी म्हणून रिंगण सोहळाही पार पडणार आहे. वारीमध्ये पवित्र मानला जाणारा रिंगणसोहळा मालिकेमधून अनुभवायला मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. तमाम भक्तांना ‘विठुमाऊली’ मालिकेच्या आषाढी विशेष भागात हा नयनरम्य सोहळा पाहायला मिळेल. पुंडलिकाच्या इच्छेखातर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणार का ? विठुराया कलीचा विनाश कसा करणार ? याची गोष्ट आषाढी एकादशीच्या विशेष भागात पाहता येईल.

विठुमाऊली’ मालिकेत वारी आणि रिंगण सोहळा पार पडणार आहे तर ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेत नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. श्री दत्तजन्म सोहळा याची देहि याचि डोळा अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. दत्तगुरुंच्या जन्माच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पण दत्तजन्म नेमका कसा झाला ? याची उत्कंठावर्धक कथा ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेच्या विशेष भागातून उलगडेल.

१२ जुलै म्हणजेच आषाढी एकादशीला भक्तीरसाने भारलेले हे विशेष भाग पहायला विसरु नका. नक्की पाहा विठुमाऊली सायंकाळी ७ वाजता आणि श्री गुरुदेव दत्त सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

VithuMauli and Shree Gurudev Datta
या आषाढी एकादशीला अंत होणार कलीचा आणि जन्म दत्त गुरुंचा