स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतय. ऐन डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमातून सायलीला झालेली अटक, अर्जुनवर झालेला जीवघेणा हल्ला आणि आता सायलीची केस लढणार कोण असा प्रश्न उभा ठाकला असताना आता मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. अर्जुनच्या मदतीने सायलीच तिची केस लढणार आहे. स्त्रीने लढायचं ठरवलं तर दहा हत्तींचं बळ तिच्यात संचारतं. सायलीही आपल्या बाळाला रडायचं नाही तर कसं खंबीरपणे लढायचं याचे संस्कार देतेय.
या सगळ्या नाट्यमय घडामोडींसोबतच सायलीचा नवा लूकही सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नेहमीच्या पारंपरिक लूकपेक्षा मॉडर्न अंदाजात सायली दिसणार असून तिच्या या नव्या रूपाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सायलीच्या व्यक्तिमत्त्वात झालेला हा बदल केवळ तिच्या लूकपुरता मर्यादित नसून तिच्या विचारांमध्ये आणि आत्मविश्वासातही झालेला बदल यातून दिसून येतो.
सायलीची भूमिका साकारणारी जुई गडकरी देखील या नव्या लूकमुळे खूपच उत्साही आहे. बऱ्याच दिवसांनंतर मॉडर्न अंदाजात वावरायला मिळत असल्यामुळे जुईसाठीही हा लूक खास आहे. सायलीच्या व्यक्तिरेखेला मिळालेला हा नवा अंदाज आणि तिच्या व्यक्तिमत्त्वात दिसणारा आत्मविश्वास साकारताना जुईला वेगळीच मजा येत आहे.
नवा लूक, नवा आत्मविश्वास आणि स्वतःसाठी लढण्याचा नवा निर्धार… सायलीच्या या नव्या रूपाचा प्रवास ‘ठरलं तर मग’मध्ये पाहायला मिळणार आहे. आता सायली कायदेशीर लढाईत कशी बाजी मारणार? अर्जुन तिची साथ कशी देणार? आणि या सगळ्या संकटातून सायली आणि तिचं बाळ सुखरूप बाहेर पडणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागून राहणार आहे. तेव्हा न चुकता पाहा ठरलं तर मग रात्री8.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Keywords : Tharla Tar Mag New Twist,Tharala Tar Mag,Star Pravah,Jui Gadkari,Aamit Bhanushali,Amit Bhanushali,Marathi Serials







