आता संधी रोज १ लाख रुपये जिंकण्याची – प्ले अलॉन्गवर ‘कोण होणार करोडपती’ खेळा, १२ जुलैपासून

Kon Honar Crorepati Play Along

‘कोण होणार करोडपती’ पाहताना घरबसल्या लखपती होण्याची संधी- प्ले अलॉंगवर ‘कोण होणार करोडपती’ खेळा, १२ जुलैपासून.

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती. आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. १२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोम.-शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. हा कार्यक्रम पाहताना प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. ‘कोण होणार करोडपती’ पाहता-पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते म्हणजे तुमचं ज्ञान ! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक या खेळात निवांत सहभागी होऊन, लखपती होऊ शकतात.

या कार्यक्रमाचं ब्रीद वाक्यच आहे की, ‘आता फक्त ज्ञानाची साथ’ आणि आता तुमच्या ज्ञानामुळे तुम्ही खरंच लखपती होऊ शकता !

पाहा, ‘कोण होणार करोडपती’, सोम.-शनि., १२ जुलैपासून  रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 

Kon Honar Crorepati Play Along Kon Honar Crorepati Play Along