‘कोण होणार करोडपती’ लवकरच येतंय तुमच्या भेटीला

Kon Honar Karodpati

२०१९ मध्ये सोनी मराठी वाहिनीनं ‘कोण होणार करोडपती’ केलं होतं. पण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाही. आता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ पुन्हा सुरू होणार आहे. ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं.

या वर्षी ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नावाजलेले अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.

‘कोण होणार करोडपती’ ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे. २४ मार्च ते २ एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.

Kon Honar Karodpati