अमोल कोल्हेंनी प्रेक्षकांना केले स्वराज्यजननी जिजामाता पाहण्याचे आवाहन

जिनं स्वराज्याच्या राजाला घडवलं अशा मुलखावेगळ्या आईची गाथा  स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून सोनी मराठी प्रेक्षकांसमोर मांडत आहे. १३ जुलैपासून या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या भागांमध्ये जिजाऊंनी कसं शिवबांना घडवलं, त्यांच्यावर कसे संस्कार केले हे सगळं पाहायला मिळणार आहे. अमोल कोल्हेंनी सर्व प्रेक्षकांना स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका पाहण्याचे आवाहन केले आहे.

१३ जुलैपासून पाहा स्वराज्यजननी जिजामाता मालिकेचे नवीन भाग सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा फक्त सोनी मराठी वर.