डॉ. कार्तिकचं लग्न दीपाशी होणार की श्वेताशी ?

New Twist In Rang Maza Vegla
रंग माझा वेगळा मालिकेच्या कथानकात येणार नवा ट्विस्ट

रंग माझा वेगळा मालिकेच्या कथानकात येणार नवा ट्विस्ट

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ते ही नव्या ट्विस्टसोबत. मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या लग्नाची धामधूम तर सुरू आहेच पण दीपा आणि तिची बहीण श्वेता यांच्या लग्नातल्या सेम टू सेम ड्रेसने मात्र कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आणि कार्तिकचं लग्न होऊ नये म्हणून सौंदर्या, श्वेता आणि राधाई यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दीपा ऐवजी श्वेताचं लग्न कार्तिकशी व्हावं म्हणून सौंदर्याने प्लॅनही आखलाय. यासाठी दीपा आणि श्वेता यांचा लग्नातला ड्रेस अगदी सारखा ठरवण्यात आलाय. आता ऐन मुहूर्तावेळी दीपा ऐवजी श्वेता लग्नासाठी उभी राहणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कार्तिकचं लग्न कोणाशी होणार याची उत्सुकता आहे.

 

 

अत्यंत उत्कंठावर्धक असे रंग माझा वेगळाचे पुढील भाग असणार आहेत. तेव्हा, लग्नातला हा मोठा ट्विस्ट पाहण्यासाठी नक्की पहा, रंग माझा वेगळा सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

New Twist In Rang Maza Vegla

New Twist In Rang Maza Vegla
रंग माझा वेगळा मालिकेच्या कथानकात येणार नवा ट्विस्ट