दिमाखात पार पडला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ रेड कार्पेटवर कलाकारांचा दिसला अनोखा अंदाज

Star Pravah Parivar Puraskar 2024

वर्षभर कलाकार आणि प्रेक्षक ज्या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पहात असतात तो स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ नुकताच दिमाखात पार पडला. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे तिसरं वर्ष. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता. वेस्टर्न विथ अ इंडियन ट्विस्ट अशी थीम असल्यामुळे कलाकारांच्या एकापेक्षा एक पेहरावाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना आपण त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. खास बाब म्हणजे पुरस्काराचं औचित्य साधून प्रवाह परिवाराकडून स्टार प्रवाहच्या मराठी दिनदर्शिकेचं अनावरण करण्यात आलं. मराठी परंपरेचं प्रतिक असणारी ही मराठी दिनदर्शिका प्रवाह कुटुंबातील कलाकारांच्या मराठमोळ्या अंदाजाने सजली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर रविवारी १७ मार्चला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४ पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असते. यंदा कोणते कलाकार पुरस्कारांवर विजेतेपदाची मोहोर उमटवणार आहेत याची उत्सुकता आहे. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा पाहायला विसरू नका रविवारी १७ मार्चला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.