‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत येणार छोटे शिवबा !

Chhatrapati Shivaji Maharaj To Enter In Swarajyajanani Jijamata
'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत येणार छोटे शिवबा !

छोट्या शिवबाच्या भूमिकेत आर्यन लहामगे !

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे स्वराज्याचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकताना, पाहताना सर्वांचा ऊर अभिमानानं भरून येतो, पण त्यांच्या या शौर्य आणि जडघडण यांमागे मोठा वाटा आहे तो त्यांच्या आईचा, जिजाऊ माँसाहेबांचा आणि म्हणूनच त्यांना ‘स्वराज्यजननी जिजामाता’ म्हटलं जातं.

सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. १३ जुलै पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  ही गाथा मुलखावेगळ्या आईची गाथा आहे. जिजाऊंनी स्वराज्याचा सिंह, रयतेचा राजा कसा घडवला याची कथा या मालिकेत मांडली आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशीच मालिकेतही शिवजन्म झाला आणि स्वराज्यबांधणीच्या प्रवासाला सुरुवात झाली. मालिका आता काही वर्षांचा अवकाश घेते आहे. आता आर्यन रवींद्रनाथ लहामगे हा बालकलाकार छोट्या शिवबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी आर्यनने एक होती राजकन्या आणि सावित्रीजोती या मालिकेत अभिनय केला आहे.

शिवबाची भूमिका साकारण्यासाठी आर्यनने घोडेस्वारी आणि तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे मिळालेल्या वेळेत त्यानं बरीच पुस्तकंही वाचून काढली आहेत.

या मालिकेतून प्रेक्षकांना जिजाऊंचे संस्कार आणि शिवबांची जडणघडण पाहायला मिळणार आहे!

पाहा, स्वराज्यजननी जिजामाता सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. आपल्या सोनी मराठीवर.

 

Chhatrapati Shivaji Maharaj To Enter In Swarajyajanani Jijamata
‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत येणार छोटे शिवबा !

Chhatrapati Shivaji Maharaj To Enter In Swarajyajanani Jijamata