“शिवानीला वीणाकडून कोणत्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ?”
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली सदस्य शिवानी सुर्वेची पुन्हा घरामध्ये एन्ट्री झाली… नेहा, माधव, अभिजीत तिला परत बघून खूप खुश झाले. तर मागच्या आठवड्यामध्ये वीणा आणि रुपालीची किशोरी शहाणे सोबतची वागणूक अत्यंत वाईट होती. संपूर्ण आठवडा “ताई तू बोलूच नकोस” हेच वाक्य वीणाकडून ऐकायला येत होत… किशोरी इतक काहीच चुकीच वागली नाही तरी रुपाली आणि वीणाने मिळून तिला टार्गेट केलं, असं का ? या गोष्टीवरून वीणा आणि रुपालीची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली… तसेच किशोरी तू एकटी खेळ, कोणी बरोबर असो वा नसो काहीच फरक पडत नाही या घरात सगळेच एकमेकांवर अवलंबून असल्याचे बाहेर दिसत आहेत… तू एकटी खेळताना दिसशील तरी… तुला काहीच गरज नाही यांच्यापुढे लोटांगण घालण्याची… असे म्हणून तिला पाठिंबा दिला… आठवड्यातील वाईट खेळाडू म्हणून शिव आणि वीणाची नावे महेश मांजरेकर यांनी घेतली… शिवने खेळणं सोडून दिले आहे असे त्यांचे म्हणणे पडले… तर उत्तम खेळाडू म्हणून नेहा आणि अभिजीतचे नाव घेतले. तर नेहा तू घाबरली आहेस का ? असे देखील विचारले… त्यावर नेहाने नाही असे उत्तर दिले… हिनाला भाकरी मिळाली नाही या मुद्दयावरून देखील घरातील सगळ्यांचीच शाळा घेतली…
आजच्या भागामध्ये शिवानी वीणाला जाब विचारणार आहे… पराग आणि वीणा बोलत असताना पराग म्हणाला होता, “आता मी हिला नादी लावतो” त्यावर द ग्रेट वीणा जगताप असं म्हणाल्या, “हा ती आहेच तशी, मग तशी म्हणजे कशी ? या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे”. तर वीणा त्यावर म्हणाली मला असं काहीही बोलल्याच आठवत नाही… आता बघूया यावर वीणा काय म्हणते आणि शिवानीच त्यावर काय म्हणणे असेल…
याचबरोबर घरामध्ये दोन गेम खेळण्यात येणार आहेत… पहिल्या गेममध्ये सदस्यांना काही गोष्टी दाखविण्यात येणार आहेत जसे खंजीर, माचीस आता बघूया घरातील सदस्य कोणाला माचीस, खंजीर याची उपमा देतात… दुसरा गेम रंगणार आहे प्रश्न – उत्तराचा, ज्यामध्ये activity एरियामध्ये एक सदस्य जाईल त्याला एक प्रश्न विचारला जाईल त्याचं उत्तर आत मधला सदस्य देईल आणि बाहेर शिवानी देखील देईल जर ती उत्तर नाही जुळली तर आतमधल्या सदस्याच्या कानाखाली बसेल… आता बघूया कोणाची उत्तर जुळतात आणि कोणत्या सदस्याच्या कानाखाली बसते.
तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.