शिवा आणि सिद्धीचे नाते वेगळ्या वळणावर…

New Twist In Jeev Zala Yedapisa
शिवा आणि सिद्धीचे नाते वेगळ्या वळणावर...

सिद्धी आणि शिवाचे नाते वेगळ्या वळणावर येऊन पोहचले आहे … शिवाचे अचानक चांगले वागणे, तिची काळजी घेणे, विचारपूस करणे, तिची पुस्तकं परत आणून देणे, तिला सरप्राईज देणे या मागचे कारण सिद्धीला माहिती नाहीये… आपला राग, तिरस्कार करणारा माणूस अचानक इतका कसा काय बदलू शकतो ? हा प्रश्न सिद्धीच्या मनात सारखा येत आहे. हे दोघे एकमेकांना कधीच स्वीकारू शकत नाही हे सत्य त्यांच्या बरोबरच घरच्यांना देखील माहिती आहे… पण आता शिवाचे हे वागणे घरच्यांसमोर देखील कोडेच आहे… काकी, मंगल, सोनी आणि यशवंत सगळेच शिवाच्या वागणुकीमध्ये झालेल्या बदलाला बघून आश्चर्यचकित आहेत…पण कुठेतरी त्यांना हे वाटते आहे कि, जर हे होत असेल तर एका दृष्टीने दोघांसाठी चांगलेच आहे…परंतु मंगल अजुनही याच्या विरोधातच आहे… शिवाचे हे वागणे फक्त आत्याबाईच्या शब्दाखातर आहे आणि त्यांना दिलेल्या वचनामुळे आहे. आता येणाऱ्या भागामध्ये शिवा सिद्धीला एक खास गिफ्ट देणार आहे… पण त्यावर लिहिलेला मजकूर वाचून सिद्धी शिवावर खूप चिडते… पण गिफ्ट बघितल्यावर हा राग दूर होईल का ? शिवा असे का वागतो आहे यामागचे सत्य तिला कळेल का ? आणि कळल्यावर ती कुठलं पाऊल उचलेल ? हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा जीव झाला येडापिसा मालिका  सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

आत्याबाई स्वत:च्या स्वार्थासाठी शिवाचा उपयोग करून घेतच होत्या पण आता तर त्या शिवा आणि सिद्धीच्या नात्याचा देखील राजकीय हेतूसाठी वापर करू लागल्या आहेत. सिद्धी आणि शिवाचे लग्न हे आत्याबाईंनी लावून दिले होते कारण त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे असे त्यांनी संपूर्ण गावासमोर सांगितले होते… मध्यंतरी सिद्धी शिवाचे घर सोडून गेली होती आणि आत्याबाईच्या सांगण्यावरून शिवाने सिद्धीची गावासमोर माफी मागितली आणि तिला घरी घेऊन आला होता… आता निवडणुका जवळ आल्यामुळे आत्याबाईच्याच सांगण्यावरून शिवा सिद्धीशी चांगले वागण्याचे नाटक करत आहे आणि सिद्धी या गोष्टी पासून अनभिज्ञ आहे… इतका मोठा विश्वासघात शिवा कडून होत आहे हे सिद्धी सहन करू शकेल ? बघूया पुढे मालिकेमध्ये काय होते…

 

New Twist In Jeev Zala Yedapisa
शिवा आणि सिद्धीचे नाते वेगळ्या वळणावर…