Home Bigg Boss बिग बॉस मराठीत तिघांची धक्कादायक वाइल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉस मराठीत तिघांची धक्कादायक वाइल्ड कार्ड एन्ट्री

Bigg Boss Marathi 6 Three Wild Card Entries

बिग बॉस मराठी सिझन ६ मध्ये अखेर प्रेक्षकांना अपेक्षित असलेला मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. रोशन भजनकर यांच्या एक्झिटनंतर बिग बॉस मराठीच्या घरात तब्बल तीन वाइल्ड कार्ड एन्ट्रीज झाल्या असून संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे यांनी घरात दमदार प्रवेश केला. या ट्रिपल एन्ट्रीमुळे घरातील वातावरणच बदलले असून सदस्यांसाठी ट्रिपल मनोरंजन आणि ट्रिपल ट्रबल निर्माण झाले आहे.

हिंदी मालिकांमधून ओळख मिळवलेली मराठी अभिनेत्री रेवा कौरासे हिने बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करताच आपली वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली. आत्मविश्वासपूर्ण अंदाजामुळे ती मजबूत स्पर्धक ठरणार असल्याची चर्चा घरात सुरू झाली आहे.

मालिकाविश्वातून प्रेक्षकांची मनं जिंकलेला लोकप्रिय चेहरा संकेत पाठक यानेही ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने घरात प्रवेश केला. संकेतच्या आगमनामुळे घरातील स्पर्धा आणखी चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक रिएलिटी शोजमध्ये सहभाग घेतलेली संस्कृती साळुंके हिने देखील दमदार एन्ट्री करत स्पर्धकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तिचा अनुभव आणि आत्मविश्वास पाहता ती इतर सदस्यांना कडवी टक्कर देऊ शकते.

या तिघांच्या एन्ट्रीनंतर घरातील समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली असून काही सदस्यांमध्ये नव्या चर्चा आणि रणनीती दिसू लागल्या आहेत. राखीला कोण टक्कर देणार आणि नव्या सदस्यांमुळे कोणावर दबाव येणार, हे पाहणे रंजक ठरत आहे.

दरम्यान, ‘भाऊचा धक्का’ या भागात रितेश भाऊंनी सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. काही सदस्यांच्या खेळाचे कौतुक करत त्यांनी त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले, तर काहींना स्पष्ट शब्दांत सल्ला दिला.

रुचितासमोर त्यांनी आपले परखड मत मांडले आणि गँगअप करणाऱ्या सदस्यांना ठाम शब्दांत समज दिली. सिंगल राखीसाठी बिग बॉसकडून खास सरप्राइज देण्यात आले, ज्यामुळे घरातील वातावरण रंगतदार झाले.

याच वेळी रितेश भाऊंसमोर प्राजक्ताने तन्वीबद्दल आपले मत व्यक्त केले असता त्यांनी त्यावर चोख उत्तर दिले आणि तन्वीला मोलाचा सल्ला दिला. त्यामुळे या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ विशेष चर्चेत राहिला.

आता बिग बॉस मराठीच्या घरात पुढे कोण जाणार नॉमिनेशनमध्ये, कोण होणार सुरक्षित आणि घराचा पुढचा कॅप्टन कोण ठरणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉस मराठी सिझन ६ दररोज रात्री ८ वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर पाहता येईल.

Bigg Boss Marathi 6 Three Wild Card Entries

 

Keywords : Bigg Boss Marathi 6 Three Wild Card Entries, BBM, BBM6, Bigg Boss Marathi, Colors Marathi, Sanket Pathak, Rewa Kaurase, Sanskruti Salunke, Reva Kaurase