‘ऊत’ मध्ये सुपर्णा श्याम दिसणार कणखर भूमिकेत

Suparna Shyam Ut Movie

छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरांत सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच ‘ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सुपर्णा ‘ऊत’ या चित्रपटात ‘गुलाब’ या कणखर मध्यमवर्गीय गृहिणीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. स्वतंत्र विचारसरणीच्या गुलाबचा आयुष्याकडे बघण्याचाSuparna Shyam दृष्टीकोन दाखवताना ‘प्रेम’ व ‘लग्न’ या दोन्ही गोष्टी ती कशा रीतीने हाताळते हे पहायला मिळणार आहे. वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित ‘ऊत’ हा मराठी चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना सुपर्णा सांगते, ‘या भूमिकेने मला खूप चांगला अनुभव दिला. ही अशा प्रेमाची कथा आहे जी कदाचित आपल्या अवतीभवती देखील असू शकते. प्रेमाला जिंकत आपण ते कसं निभावतो? याची कथा दाखवताना प्रेमाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन ही ‘ऊत’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे’.

Suparna Shyam Ut Movieसुपर्णा सोबत राज मिसाळ, आर्या सावे ही नवी जोडी या चित्रपटात दिसणार आहे. राजकुमार तांगडे, अनिकेत केळकर, प्राजक्ता केळकर, पुरषोत्तम वाघ, शैलेश कोरडे, अर्चना रावल, दीपक पाटील, वैदेही ठाकूर, सिद्धेश्वर थोरात, अभय कुलकर्णी, श्रेया देशमुख, धनश्री साटम आदि कलाकारांच्या सुद्धा यात भूमिका आहेत.

‘ऊत’ हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.