जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनीच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रचला इतिहास; ठरला भारतात १०० कोटी रुपयांचा गल्ला पार करणारा पहिलावहिला मराठी चित्रपट.
जिओ स्टुडिओज् आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने आपली ऐतिहासिक यशस्वी घोडदौड सुरू ठेवत, भारतात १०० कोटी रुपयांचा गल्ला पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतात *१०१.४० कोटी रुपयांची* उत्कृष्ट कमाई करून, या चित्रपटाने आपला ब्लॉकबस्टर दर्जा अधिकच मजबूत केला आहे. मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतचा *सर्वात मोठा ओपनिंग डे*, *सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड* आणि *सर्वाधिक एका दिवसातील कलेक्शनसह* विक्रमांची नोंद केल्यानंतर, या भव्य चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यात आणि चौथ्या वीकेंडमध्येही आपली यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
*बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारत निव्वळ):*
पहिला आठवडा: ₹५७.७० कोटी
दुसरा आठवडा: ₹२७.०० कोटी
तिसरा वीकेंड: ₹८.४० कोटी
तिसरा आठवडा + चौथा वीकेंड:
१८ वा दिवस (सोमवार): ₹१.२५ कोटी
१९ वा दिवस (मंगळवार): ₹१.४५ कोटी
२० वा दिवस (बुधवार): ₹१.२० कोटी
२१ वा दिवस (गुरुवार): ₹०.९५ कोटी
२२ वा दिवस (शुक्रवार): ₹०.७० कोटी
२३ वा दिवस (शनिवार): ₹१.३५ कोटी
२४ वा दिवस (रविवार): ₹१.४० कोटी
*फक्त भारतातील एकूण कमाई: ₹१०१.४० कोटी*
मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण क्षण असलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट मराठी माणसासाठी आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातीत वारशाला प्रचंड अभिमानाने मोठ्या पडद्यावर पाहण्याचे एक सुवर्ण माध्यम बनला आहे आणि जगभरातील प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रेमाने या चित्रपटाला आणि महाराजांच्या ऐतिहासिक वारसाला पुन्हा एकदा सन्मानित केले आहे. चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी या यशासाठी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Keywords : Raja Shivaji Collection, Raja Shivaji, Raja Shivaji Movie Collection, Raja Shivaji 100 Crores, Raja Shivaji Box Office Collection





