सोनी मराठी वाहिनीवर नारीशक्ती विशेष सप्ताह १९ ते २४ ऑक्टोबर.

Sony Marathi's Naari Shakti Vishesh Saptah

सोनी मराठी वाहिनीवर नवरात्रीदरम्यान नारीशक्ती विशेष आठवडा साजरा होणार आहे. सोनी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या मालिकांमधून स्त्री-सबलीकरण दाखवले आहे.

नवरात्री मध्ये नऊ दिवस देवीची पूजा करून स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. स्वराज्याच्या ध्येयपूर्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या, शिक्षणाचा ध्यास घेऊन खडतर प्रवास करणाऱ्या आणि आलेल्या संकटाना निडरपणे तोंड देणाऱ्या सोनी मराठी वाहिनीच्या नायिकांचा प्रवास ‘नारीशक्ती विशेष सप्ताह’ या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 

 

आत्मसन्मानाची ज्योत निर्धारानं तेवत ठेवणाऱ्या स्त्रीशक्तीचा जागर! नारीशक्ती विशेष सप्ताह १९ ते २४ ऑक्टोबर, संध्या. ७-९ वा. ‘आई माझी काळुबाई’, ‘सावित्रीजोती’ आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिका पाहायला विसरू नका सोनी मराठी वाहिनीवर.