वीणा जगताप ऐवजी आता रश्मी अनपट दिसणार आर्याच्या भूमिकेत | आई माझी काळुबाई

Rashmi Anpat Replaces Veena Jagtap As Aarya In Aai Majhi Kalubai

मराठी मालिका विश्वातील लोभस चेहर्‍याची गोड अभिनेत्री म्हणून रश्मी अनपट हे नाव डोळ्यासमोर येतं. रश्मी आता सोनी मराठी वाहिनीवरच्या अफाट लोकप्रियता लाभलेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत ‘आर्या’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.

भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही रश्मीच्या अभिनयाची खासियत.

पुण्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना झालेले नाट्यसंस्कार आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘स्वभावाला औषध नाही’, ‘गाठीभेटी’ या नाटकांतल्या लक्षवेधी भूमिकांमुळे तिच्या अभिनयाचा पाया भक्कम झाला आहे. त्यामुळेच तिच्या प्रत्येक भूमिकेबाबत प्रेक्षकांना उत्सुकता असते.

‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत सध्या विराटच्या असुरी प्रभावाखाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले पुरोहित कुटुंब यांच्यातला संघर्ष शिगेला पोचला आहे. या महत्त्वाच्या  टप्प्यावर रश्मीने साकारलेली आर्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असेल.

लोकप्रिय युवा अभिनेता विवेक सांगळे याच्याबरोबर अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे या दमदार अभिनयसंपन्न कलाकारांबरोबर रश्मीचे ‘आर्या’ साकारणे हे या मालिकेचे वेगळेपण ठरेल.

मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता, २९ मार्च ते ३ एप्रिल हा सप्ताह एका तासाच्या विशेष भागांचा असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, ‘आई माझी काळुबाई’. सोम.-शनि., संध्या. ६.३०  वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 

Rashmi Anpat Replaces Veena Jagtap As Aarya In Aai Majhi Kalubai Rashmi Anpat Replaces Veena Jagtap As Aarya In Aai Majhi Kalubai