सिद्धार्थ चांदेकर का म्हणतोय सांग तू आहेस का ?

Siddharth Chandekar - Sang Tu Aahes Ka,

अग्निहोत्र, कश्याला उद्याची बात, जिवलगा यासारख्या गाजलेल्या मालिकांनंतर सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा एका नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सांग तू आहेस का’ असं त्याच्या नव्या मालिकेचं नाव असून ७ डिसेंबरपासून स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु होत आहे. यावर्षातला हा नवा प्रोजेक्ट असल्यामुळे सिद्धार्थ फारच उत्सुक आहे.

या नव्या मालिकेविषयी सांगताना सिद्धार्थ म्हणाला, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. कारण अग्निहोत्र ही माझी पहिली मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. चांगली वाहिनी, चांगली कथा, चांगली निर्मिती संस्था आणि चांगला दिग्दर्शक हा मेळ जुळून आल्यामुळेच ही मालिका मी स्वीकारली. लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मालिकेचा हा बाज माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे. मी या आधी हॉरर जॉनरमध्ये काम केलेलं नाही. मालिकेचा सेटअप ज्यापद्धतीने तयार केला आहे तो प्रेक्षकांसाठी नक्कीच नवा अनुभव असेल. विशेष म्हणजे मालिकेत नवनवी सरप्राईजेस आहेत जी प्रत्येक भागात उलगडत जातील. या मालिकेची गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याची मला खात्री आहे.’

तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Siddharth Chandekar - Sang Tu Aahes Ka, Siddharth Chandekar - Sang Tu Aahes Ka,