बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ५७ | शिव शिवानीसमोर मांडणार त्याचे मत

Shiv Confessed His Feelings Bigg Boss Marathi 2
शिव शिवानीसमोर मांडणार त्याचे मत

“घरात रंगणार कॅप्टनसी टास्क”

बिग बॉस मराठीध्ये कालच्या भागामध्ये वैशाली म्हाडे घराच्या बाहेर पडल्याने अभिजीत, शिव, विणा यांना वाईट वाटले आहे… आज घरामध्ये “हल्ला बोल” हे कॅप्टनसी टास्क रंगणार आहे….हे कार्य अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे मध्ये रंगणार आहे. आता या आठवड्यामध्ये शिवानी कि अभिजीत कोणाला बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळणार हे बघणे रंजक असणार आहे…तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर…

आज शिवानी आणि शिवमध्ये विणा आणि शिवच्या नात्याबद्दल चर्चा रंगणार आहे… त्यामध्ये शिवानी शिवला सल्ला देताना दिसणार आहे. शिवानीचे म्हणणे आहे, तुझा टॅटू खूपच छान आहे, घराबाहेर गेल्यावर मी देखील अजिंक्यच्या नावाचा टॅटू करणार आहे… शिवचे म्हणणे आहे टॅटू म्हणजे खूप मोठी गोष्ट असते ना ? शिवानीने सांगितले अजिंक्यने माझ्या नावाचा टॅटू केला आहे… शिवचे म्हणणे आहे, खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यभर आपल्या शरीरावर राहणार, टॅटूला बघितल्यावर राग नाही आला पाहिजे … शिवानीने त्याला विचारले आता दोघांकडून देखील सारखी भावना आहे असे समजू शकते, आता बाहेर जाईपर्यंत आणि गेल्यावर देखील असचं राहू दे… त्यावर शिव म्हणाला “बघू” तर शिवानीला जरा धक्का बसला आणि त्यावर ती म्हणाली “बघू?” त्यावर शिवने सांगितले, बघू म्हणजे माझी देखील तीच इच्छा आहे, पण आपण कोणावर जबरदस्ती नाही ना करू शकत. मी इथे जसा दिसत आहे तसा शंभर टक्के खरा आहे आणि ती देखील खरीच आहे. त्यामुळे बाहेर जाऊन देखील असचं राहिलं नाही बदलणार”.

 

Shiv Confessed His Feelings Bigg Boss Marathi 2Shiv Confessed His Feelings Bigg Boss Marathi 2

Shiv Confessed His Feelings Bigg Boss Marathi 2Shiv Confessed His Feelings Bigg Boss Marathi 2

Shiv Confessed His Feelings Bigg Boss Marathi 2
शिव शिवानीसमोर मांडणार त्याचे मत