बिग बॉस मराठी सिझन 2 – विणा – शिवला मिळणार शिक्षा !

Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे… ज्यामध्ये बिग बॉस यांनी कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत… ज्यांचे उल्लंघन टास्क दरम्यान कोणीच करू शकत नाही… बिग बॉसचे नियम सगळ्या सदस्यांना पाळणे बंधनकारक असते… पण शिव आणि विणाकडून महत्वाच्या नियमाचे उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर एक कार्य सोपवले ज्यानुसार त्यांना टॉप २ आणि बॉटम २ सदस्यांची नावे द्यायची होती ज्यांना कॅप्टनसीची उमेदवारी मिळणार होती… सदस्यांनी टॉप २ मधील फक्त एकाच सदस्याचे नाव दिले ते म्हणजे अभिजीत केळकर दुसरे नाव बिग बॉस यांनीच सांगितले जे सदस्यांनीच चर्चेमध्ये घेतले होते आरोह वेलणकर… आता अभिजीत आणि आरोहमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे… आता बघूया या टास्क मध्ये कोणता ग्रुप शक्ति पेक्षा युक्ति वापरुन हा टास्क त्यांच्या उमेदवारासाठी जिंकेल. आरोहच्या टीममध्ये शिवानी, अभिजीत बिचुकले, वीणा आणि नेहा असणार आहेत तर अभिजीत केळकरच्या टीममध्ये किशोरी, रूपाली, शिव आणि हीना असणार आहेत… तेंव्हा नक्की बघा कोण बनणार या आठवड्यात घराचा नवा कॅप्टन आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्या दरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. पण, कार्या दरम्यान शिव आणि विणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे शिक्षा म्हणून शिव आणि विणा यांनी रांझणातील खड्या व्यतिरिक्त गार्डन, जीम आणि स्वीमिंग पूल मध्ये पडलेले सर्व खडे दोन्ही टीम्सच्या टोपलीत जसे होते तसे समान पातळीवर जमा करायचे आहेत…

रांझणातील तळाला गेलेले पाणी वरती यावे यासाठी शक्तीऐवजी युक्ती वापरून कावळ्याने खडे टाकून पाणी प्यायले होते. कॅप्टन्सीची संधी आज तळाला गेलेल्या पाण्यासारखी आहे… जी सदस्यांना खडे टाकून  मिळवायची आहे. यासाठी  बिग बॉस सदस्यांवर “तहानलेले कावळा” हे कॅप्टन्सी कार्य सोपवणार आहेत… प्रत्येक टीमने आपआपल्या जबाबदार्‍या वाटून घेतल्या आहेत… आता टास्क मध्ये पुढे काय काय होईल ? सदस्य अजून कोणत्या चुका करतील ? कोणत्या नियमांचे उल्लंघन करतील ? हे बघूया बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2Shiv And Veena Punished Bigg Boss Marathi 2