बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर !

Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर !

बिग बॉस मराठी सीझन २ – WEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी घरामध्ये पुन्हा एंट्री घेतलेल्या अभिजीत बिचुकले पासून सगळ्यांनाच फैलावर घेतले… या आठवड्याच्या भागामध्ये देखील सदस्यांची चांगलीच कानउघडणी केली… अभिजीत बिचुकले यांनी घरातील काही काम करण्यास नकार दिला, त्यांना महेश मांजरेकर यांनी कडक शब्दामध्ये खडसावले आणि कुठलेही काम करण्यात कमीपणा नसतो, घरातील नियम हे पळावेच लागतात असा सल्ला दिला… तर शिव, वीणा आणि अभिजीत केळकरची देखील कानउघडणी केली. शिवला असे देखील सांगितले तू चांगला खेळतोस, बिग बॉसचा विजेता होण्याचे गुण तुझ्यात आहेत. परंतु, वीणाची नेहमी वकिली करत असतोस त्यामुळे तू वाईट ठरतोस आणि वीणा वीक दिसते. तर महेश मांजरेकर यांनी शिवची आई आणि अभिजीतच्या मुलाचे कौतुक केले की, त्याच्या मुलाला सगळ्यांची नावे माहिती होती… सदस्यांमधील गंमत, वाद विवाद सुरू राहिले… पण तो महत्वाचा क्षण आला ज्यामध्ये दर आठवड्याला एका सदस्याला घराबाहेर पडणे अनिवार्य असते. या आठवड्यामध्ये हीना, वीणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रूपाली नॉमिनेट झाले होते… रूपाली आणि वीणा डेंजर झोनमध्ये आले पण रूपालीला मतं कमी मिळाल्याने या आठवड्यामध्ये घरामधून बाहेर जावे लागले. आता येत्या आठवड्यामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनेल ? सदस्यांना कोणते टास्क मिळणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्यावर रूपाली भोसलेला तिच्या आतापर्यंच्या प्रवासाची सुंदर AV दाखविली… एक विशेष अधिकार मिळाला आणि तिने ठरवल्याप्रमाणे हीनाला वाचवले. रूपाली म्हणाली मी हे ठरवले होते की मी तुला वाचवेन जेंव्हा मी इथे उभे असेन…

फ्रेंडशिप डे बद्दल सदस्यांना सरप्राइझ दिले… महेश मांजरेकर यांनी रीमा लागू यांच्याशी बोलणे का थांबवले आणि त्याचे त्यांना अजूनही वाईट वाटते असे सांगितले…  किशोरी शहाणे यांना अलका कुबल आठल्ये यांनी खास संदेश दिला आणि किशोरीचे कौतुक देखील केले… “ती गोड स्वभावाची आहे… मुळातच तिच्यात भांडणं, तंटे, आक्रस्ताळेपणा नाहीये… आता तुझा स्पष्टवक्तेपणा दिसू दे, आरोप सहन करू नकोस” असे सांगितले… तर किशोरी यांनी देखील अलका कुबल यांच्या मैत्रीविषयी काही बाबी सांगितल्या… तर ऋजुता देशमुख हिने अभिजीत केळकरला संदेश दिले… तर शिवानीला खूप मोठे सरप्राईझ मिळाले कारण अजिंक्य ननावरे याने तिला संदेश दिला… तर शिवानीने उखाणा देखील घेतला. हीनाला सायरा शेख म्हणजेच कुकीने संदेश दिला. वीणाला अक्षया गुरवने संदेश दिला. राधा प्रेम रंगी रंगली मालिकेच्या सेटवरील काही किस्से सांगितले. रूपालीला सुशांत शेलारने सल्ला दिला. अभिजीत बिचुकलेंना सातारामधून तर खुद्द महेश मांजरेकर यांनी शुभकामना दिल्या… तर नेहाला आपला आवडता अभिनेता म्हणजेच जितेंद्र जोशीने प्रोत्साहन दिले. नेहाला आणि घरच्यांना अतिशय सुंदर संदेश दिला…  शिवला त्याच्या प्रिय मित्राने संदेश दिला. वूट आरोपी कोण मध्ये साधनाने शिव आणि वीणाला आरोपी ठरवले, आणि शिव आणि वीणाला शिक्षा दिली की एकमेकांचे दोन वाईट गुण सांगायचे होते… तर वूट चुगली बूथमध्ये शिवला त्याच्या चाहत्याने अभिजीत बिचुकलेंबद्दल चुगली केली.

बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

 

Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2

Rupali Bhosle Evicted Bigg Boss Marathi 2
बिग बॉस मराठीच्या घरामधून रूपाली भोसले बाहेर !