पिंगा गर्ल्सचा प्रवास पुन्हा सुरु! तीन वर्षांनंतर दुरावा मिटवण्यासाठी सज्ज होणार मैत्रिणी
‘कलर्स मराठी’वरील लोकप्रिय मालिका पिंगा गं पोरी पिंगा लवकरच एका नव्या वळणावर पोहोचणार आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेत आता तीन वर्षांचा लीप घेतला जाणार असून, पात्रांच्या आयुष्यात मोठे बदल घडलेले दिसतील. वेळ, परिस्थिती, नाती आणि स्वप्नं – या सगळ्यांमधून पात्रांची कथा एका नवे अध्यायाकडे वळणार आहे.
या खास टर्निंग पॉइंटची सुरुवात होणार आहे ‘पिंगा गं पोरी पिंगा – Reunion’ या एका तासाच्या विशेष भागातून, जो १० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कथानकातले नवे वळण
कथेत वल्लरीचं हॉल तिकीट इंदूकडून जाळलं जातं आणि तिला परीक्षेला बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होतो. मात्र, पिंगा गर्ल्सचा जोरदार पलटवार पाहायला मिळतो आणि त्या पुन्हा एकत्र येऊन परिस्थितीला सामोऱ्या जातात.
दरम्यान, घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेरणाचं तिला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्न होतं. श्वेता मात्र तिच्या आयुष्यातील बदलांमुळे व्यस्त झाली आहे, तर वल्लरीचं वकील होण्याचं स्वप्न पूर्ण झालं असून स्वतःचं घर आणि नाती तिने कमावली आहेत.
पण इंदुमती अजूनही बदललेली नाही – पैसा आणि नाव मिळालं तरी मुलं नसल्यामुळे ती वल्लरीला टोमणे मारतच असते. याच काळात पिंगा गर्ल्सच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. वल्लरी मात्र ठरवते की स्वप्नं पूर्ण झाली असली तरी मैत्रिणी हरवता कामा नयेत, आणि त्या सगळ्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा निर्धार करते.
प्रेक्षकांसाठी नवा प्रश्न
प्रेरणाचं अजितसोबत झालेलं लग्न, श्वेता आणि मिठूच्या आयुष्यात घडलेले बदल – या सगळ्यांमुळे त्यांच्या नात्यांवर काय परिणाम झाला असेल? लग्नानंतर मैत्री तशीच राहते का? मिठू आणि श्वेतामध्ये आलेला दुरावा आणि वल्लरीचे सगळ्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न – हे सगळं आगामी भागांत उलगडणार आहे.
केवळ मैत्री नव्हे, तर प्रेरणादायी प्रवास
पिंगा गं पोरी पिंगा आता केवळ मैत्रीची गोष्ट राहिलेली नाही, तर प्रत्येक मुलीच्या संघर्ष, स्वप्नपूर्ती आणि एकमेकींसाठी लढण्याच्या जिद्दीचं प्रतिक बनली आहे. येणारे भाग आणखी गुंतवून ठेवणारे आणि भावनिक असतील, याची झलक या विशेष भागातून मिळणार आहे.
📺 पाहायला विसरू नका – ‘पिंगा गं पोरी पिंगा – Reunion’, १० ऑगस्ट, एक तासाचा विशेष भाग, संध्या. ७ वा., फक्त कलर्स मराठीवर !











