जीव झाला येडापिसा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात !

Jeev Zala Yedapisa Shoot Resumes
जीव झाला येडापिसा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात !

पुन्हा रंगून जाऊया शिवा – सिध्दीच्या नात्याच्या नव्या रंगात…

पॅकअप होऊच नये असे वाटले – विदुला चौघुले

राजा रानीची गं जोडी मालिकेनंतर आता जीव झाला येडापिसा मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे… जीव झाला येडापिसा मालिकेला पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. गावातील रांगडा गडी शिवा म्हणजेच अशोक फळ देसाई, सिद्धी म्हणजेच विदुला चौघुले यांनी त्यांच्या पहिल्याच मालिकेमध्ये प्रेक्षकांना आपलेसे केले तसेच आत्याबाई म्हणजेच चिन्मयी सुमित, जलवा, मंगल यांच्या भूमिकांना सगळ्यांचीच पसंती मिळाली… आता हे लाडके कलाकार सज्ज झाले आहेत तुमचे मन जिंकायला… सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाला सुरुवात झाली. शूटिंगला सुरुवात होण्याआधी जवळपासचा परिसर, मेकअप रूम्स, सेटचे सॅनिटाईझेशन करण्यात आले. मालिका आता रंजक वळणावर पोहचली असून, येत्या २१ जुलैपासून मालिकांचे नवे भाग रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे… तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा मालिकेचे नवे भाग सोम ते शनी रात्री ८ वा.

View this post on Instagram

मास्कचा वापर आणि Social Distancing चं पालन करून सुरू झाली आहे कलाकारांची जय्यत तयारी. होणार जीव येडापिसा जेव्हा घडणार आपली भेट लय भारी. तुमच्यासाठी घेऊन आलोय #JeevZalaYedaPisa मालिकेच्या चित्रीकरणा दरम्यानची ही खास क्षणचित्रे. #ColorsMarathi @colorsmarathiofficial https://marathicelebs.com/jeev-zala-yedapisa-shoot-resumes/ #JeevZalaYedapisaShootStarts #ShootResumes #Siddhi #Shiva #MarathiSerials #MarathiCelebs . . ————– . For interesting entertainment updates, follow the page right now – @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.

A post shared by MarathiCelebs.com (@marathicelebs_com) on

मालिकेच्या कलाकारांमध्ये, आणि संपूर्ण टिममध्येच एक वेगळ्या प्रकारचा उत्साह, उमेद होती… तब्बल तीन महिन्यांनंतर शूटिंग सुरू झाल्याने सगळेच खूप आनंदी आहेत… शूटिंगचे वातावरण, एकत्र जेवण, गप्पा, सीनच्या वेळेसची रिहर्सल आम्ही सगळ्यांनीच खूप मिस केली… त्यामुळे पहिल्या दिवशी सेटवर आलो शूटिंग सुरू झाले… अॅक्शन – कट हे शब्द बर्‍याच दिवसांनी कानावर पडले त्यावेळी खूप भरून आले… असं वाटल पॅकअप होऊच नये… तो खूप वेगळाच क्षण होता, एक वेगळीच भावना होती’. असे सिध्दीची भूमिका साकारणारी विदुला चौघुले म्हणाली.

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सिध्दी आणि शिवाचं प्रेम दिवसा गणिक फुलू लागले… या दोघांमधले प्रेमळ क्षण पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि ते आता मालिकेमध्ये बघायला मिळाले… शिवा आणि सिद्धीच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा येऊ लागला… गैरसमज आणि वाद विसरून एकमेकांचा हात घट्ट धरून त्यांनी सुखी संसाराची वाटचाल सुरू केली… यामध्ये एकमेकांना खुश ठेवण्याचा ते खूप प्रयत्न देखील करत आहेत… आत्याबाईंनी सोनी आणि सरकारच्या लग्नाचा प्रस्ताव पुन्हा एकदा लष्करे कुटुंबासमोर मांडला… आत्याबाईंच्या निर्णयाला पहिल्यांदा शिवाने नकार दिला… आणि त्यामुळे मंगल आणि आत्याबाई दोघांवर नाराज आहेत… सिध्दीमुळे हे घडले आहे, सिद्धी याला जबाबदार आहे आणि त्यामुळे आता मंगल नवीन कुठली खेळी खेळणार, सासू – सुनेच्या या भांडणात शिवा सिध्दीला कसे सांभाळून घेईल, सिद्धी – शिवाच्या नात्यात आलेला गोडवा आत्याबाईंमुळे हिरावून तर जाणार नाही ना ? मंगलमुळे या दोघांमध्ये दुरावा येईल ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत…

तेंव्हा आपण सज्ज होऊया पुन्हा एकदा शिवा – सिध्दीच्या नात्याच्या नव्या रंगात रंगून जाण्यासाठी २१ जुलैपासून रात्री ८.०० वा नक्की बघा जीव झाला येडापिसा आपल्या कलर्स मराठीवर.

 

Jeev Zala Yedapisa Shoot Resumes Jeev Zala Yedapisa Shoot Resumes Jeev Zala Yedapisa Shoot Resumes Jeev Zala Yedapisa Shoot Resumes Jeev Zala Yedapisa Shoot Resumes Jeev Zala Yedapisa Shoot Resumes Jeev Zala Yedapisa Shoot Resumes

Jeev Zala Yedapisa Shoot Resumes
जीव झाला येडापिसा मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात !