बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात !

Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात !

संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” ही मालिका कलर्स मराठीवर तुफान गाजते आहे. या मालिकेमुळे संत बाळूमामा हे आता केवळ दक्षिण महाराष्ट्राचं दैवत नव्हे तर तमाम महाराष्ट्राचं श्रध्दास्थान बनलं आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. बाळूमामांच्या प्रपंचाचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार रसिकांना मालिकेतून घडत आहे. दिनदुबळ्यांचा कैवार घेणारे, गरीबांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे, भक्ताच्या हाकेला धावून जाणारे संत बाळूमामा, त्यांच्या अगाध लीलांची गाथा, मालिकेचे नवे भाग आपल्या भेटीला येत आहेत २१ जुलैपासून संध्या ७.३० वा. कलर्स मराठीवर … मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून शासनाच्या नियमांचे योग्य पालन करून आणि योग्य ती काळजी घेत मालिकेच्या चित्रीकरणाला जोरात सुरुवात झाली आहे…

View this post on Instagram

शासनाच्या नियमांचे योग्य पालन करून आणि Social Distancing बाळगून तुमच्या आवडत्या #BalumamachyaNavanaChangabhala या मालिकेचं चित्रीकरण जोरात सुरु झालं आहे. आपल्या भेटीची उत्सुकुता अशीच राहू द्या. कारण येतोय आम्ही तुमच्या घरी. घेऊन नवी उमेद, नवी भरारी. @colorsmarathiofficial पूर्ण जाणून घेण्यासाठी पुढील लिंक फॉलो‌ करा. स्वाईप अप लिंक स्टोरी आणि highlights मध्ये मिळेल. http://marathicelebs.com/balumamachya-navana-changbhala-shoot-resumes/ #ColorsMarathi . #ShootResumes #ColorsMarathiSerials #ColorsMarathiIsBack #MarathiCelebs . . ————– . For interesting entertainment updates, follow the page right now – @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.

A post shared by MarathiCelebs.com (@marathicelebs_com) on

याबद्दल बोलताना मालिकेचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते – संतोष अयाचित म्हणाले, “ टेलीव्हिजन इंडस्ट्री इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने बंद पडली. परंतु, सरकार, टिव्ही वाहिनी, प्रमुख निर्माते ह्यांच्या प्रयत्नाने पुन्हा चित्रीकरण सुरु झाले आहे. संसर्ग होईल असे वातावरण असताना देखील सगळे कलाकार, तंत्रज्ञ ह्यांनी सर्व काळजी घेऊन प्रत्यक्ष सेट वर येऊन काम करायला सुरुवात केली आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं हि मालिका कलर्स मराठीवर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारी संध्याकाळी ७.३०वा. पुन्हा सुरू होते आहे. ह्या काळात प्रेक्षकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाळूमामा पुन्हा कधी दिसणार अशी विचारणा केली होती. प्रेक्षकांचे बाळूमामावर प्रेम आहे, श्रद्धा आहे त्याचे कारण प्रत्यक्ष बाळूमामांनी आयुष्यभर अव्याहत सर्व स्तरातल्या माणसांसाठी जे कार्य केलं त्यात आहे. बाळूमामांनी केवळ उपदेश नाही केला तर असंख्य कुटुंबाचा, माणसांचा उत्कर्ष होईल असे त्यांना सहाय्य केले असंख्य माणसांना योग्य वाटेवर नेले. पाच राज्यात भ्रमण करताना माणसं त्यांच्याशी कायमची जोडली गेली आणि आज त्याचा विस्तार पहायला मिळतो आहे. बाळूमामांच्या चरित्राला आता खरी सुरुवात झाली आहे आणि त्यातले अद्भुत प्रसंग आणि भव्य चरित्रपट पहायला महाराष्ट्रातले प्रत्येक कुटुंब कलर्स मराठी पाहायला एकत्र येईल ह्याची आम्हाला खात्री आहे”.

नव्या भागांसोबत आम्ही येत आहोत तुमच्या भेटीला २१ जुलैपासून संध्या ७.०० वा. पासून कलर्स मराठीवर !

 

Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes

Balumamachya Navana Changbhala Shoot Resumes
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात !