आत्याबाईंमुळे येणार शिवा – सिध्दीच्या नात्यात दुरावा ?

Jeev Zala Yedapisa Serial Update
आत्याबाईंमुळे येणार शिवा – सिध्दीच्या नात्यात दुरावा ?

सिद्धी – शिवा थांबवू शकतील सोनी – सरकारचं लग्न ?

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे… शिवा आणि सिध्दीचे आयुष्य खूप सुंदर वळणावर येऊन पोहचले आहे… या दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग आल्याने त्यांच्या सुखी संसाराची नवी सुरुवात झाली आहे असे वाटत असतानाच आता आत्याबाईंमुळे एका नव्या वादाची ठिणगी यांच्या नात्यात पडली आहे. शिवा आणि सिध्दीच्या गोड नात्याला आत्याबाईंची नजर लागणार असे दिसून येत आहे… नुकतच आत्याबाईंनी सोनी आणि सरकारच्या लग्नाचा प्रस्ताव पुन्हा एकदा लष्करे कुटुंबासमोर मांडला आहे… सोनी – सरकारच्या लग्नाला सिद्धीचा पहिल्यापासून विरोध आहेच, आणि तिने तो सगळ्यांसमोर व्यक्त देखील करून दाखवला होता… पण यामुळे आता शिवा – सिद्धीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे… सिद्धीने आत्याबाईंना देखील हे ठणाकवून सांगितले आहे की हे लग्न ती कुठल्याही परिस्थितीत नाही होऊ देणार. या सगळ्यावर शिवाचे काय मत असेल ? शिवा आत्याबाईंना काय सांगेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

द्वेष, राग, भांडण या भावनांना आता सिध्दी शिवाच्या आयुष्यात जागा उरलेली नाही… आणि हेच बघून कुठेतरी मंगल आणि आत्याबाई नाराज आहेत… हे सगळं घडत असताना आता कुठे सिद्धी – शिवाच्या नात्यात आलेला गोडवा आत्याबाईंमुळे हिरावून तर जाणार नाही ना ? सिध्दीचे म्हणणे शिवाला कळेल का ? आत्याबाईंमुळे या दोघांमध्ये दुरावा येईल ? जाणून घेण्यासाठी बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि  रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

 

Jeev Zala Yedapisa Serial Update
आत्याबाईंमुळे येणार शिवा – सिध्दीच्या नात्यात दुरावा ?