शिवादादाची लाडकी सोनीचा आवडता छंद म्हणजे चित्रकला !

Soni Loves To Sketch
शिवादादाची लाडकी सोनीचा आवडता छंद म्हणजे चित्रकला !

सोनीची सुंदर चित्रे तुम्ही पाहिलीत का?”

जगभरात सध्या करोना विषाणूने थैमान घातला आहे. या विषाणूने जगभरातील हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत. करोनाच्या धास्तीमुळे मालिकांचे, चित्रपटांचे शूटिंग देखील रद्द करण्यात आले आहेत… शूटिंग दरम्यान 12 – 14 तास कलाकार आणि मालिकांचे संपूर्ण युनिट सेटवर असते आणि त्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला… आता कलाकार शूटिंग नसल्याने आपआपल्या घरी परत जात आहेत किंवा त्यांचा छंद जोपासत आहेत… शूटिंगच्या व्यस्त शेड्यूलमध्ये आपल्या आवडीचे काम करायला तसा कमीच वेळ मिळतो… आणि म्हणूनच आता या सुट्टीचा उपयोग ते पुरेपूर करून घेताना दिसत आहेत… कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमधील सोनी म्हणजेच शर्वरी जोग हीला चित्रकलेची विशेष आवड आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. शर्वरी म्हणजे तुमची लाडकी सोनी ही सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. शूटिंगमध्ये आपले छंद जोपासण, नातेवाईकांना भेटण, वेळात वेळ काढून स्वत:ची काळजी घेण म्हणजे या कलाकारांसाठी तारेवरची कसरत असते. या सगळ्या धावपळीच्या आयुष्यात आता मात्र शर्वरी तिचा लहानपणापासूनचा छंद जोपासते आहे आणि तो म्हणजे चित्रकला. यामध्ये देखील तिला Illustrations काढायला जास्त आवडत… तिच्याकडे water कलर्स, पोस्टर कलर्स, क्रेओन्स, ब्रश अस बरच collection आहे.

या संदर्भात बोलताना सोनी म्हणजेच शर्वरी म्हणाली, ‘मी GD आर्ट्स केले आहे, म्हणजेच मी कमर्शियल आर्टिस्ट आहे. इतर वेळेस शूट सुरू असत आणि रोजचं शूट असल्याने मला स्केच आणि चित्र काढायला वेळ नाही मिळत. पण तरी देखील स्केच बुक माझ्यासोबत नेहेमीच असते मी सेट वर देखील घेऊन जाते. जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा मी स्केच काढते. पण, आता मला भरपूर वेळ मिळाला आहे, तर मी मनसोक्त चित्र काढणार आहे… ही हौस आता मी पूर्ण करणार आहे”.

 

Soni Loves To Sketch - Jeev Zala Yedapisa Soni Loves To Sketch - Jeev Zala Yedapisa Soni Loves To Sketch - Jeev Zala Yedapisa

Soni Loves To Sketch
शिवादादाची लाडकी सोनीचा आवडता छंद म्हणजे चित्रकला !