सोनी मराठीची प्रॉडक्टिव्ह कल्पना ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’

Aathshe Khidkya Naushe Daara
सोनी मराठी, श्रीरंग गोडबोले आणि १४ कलाकार यांच्याकडून प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’

सध्या क्वॉरंटाईनमुळे प्रत्येक जण आपापला वेळ प्रॉडक्टिव्ह पद्धतीनं घालवण्याचा विचार करतोय. नवनवीन गोष्टी करण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या जात आहेत, प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अशीच एक मजेशीर युक्ती सोनी मराठी वाहिनीने लढवली आहे. नवीन विषय हाताळणं आणि लगेच प्रेक्षकांबरोबर कनेक्ट होणं ही तर या वाहिनीची खासियत.

‘सोसायटीत आता चौकश्या होणार, सोसायटीत जे काही घडतंय ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढणार, चर्चा म्हणजेच गॉसिप्स होणार आणि नवीन रहिवाश्यांची ओळख होणार कारण ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या ह्या मालिकेचं लिखाण आणि दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांनी केलं आहे. श्रीरंग गोडबोले यांच्या मालिका  लहान मुलांपासून ते अगदी प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांचंच दिलखुलास मनोरंजन करतात. त्यांच्या या नव्या मालिकेत एकूण १६ कलाकार आहेत. कलाकारांशिवाय मालिका होणं नाही, पण सध्या शुटिंग बंद असल्यामुळे शुटिंग कसं होणार असाही प्रश्न पडला… तर यामध्ये एक इंट्रेस्टिंग गोष्ट दडली आहे ज्यासाठी कलाकारांचं विशेष कौतुक व्हायलाच हवं. या नव्या मालिकेत असलेले सर्व कलाकार हे आपापल्या घरातून शूट करणार आहेत आणि हे त्यांच्यासाठी आव्हान असलेले आणि एक वेगळा अनुभव देणारे आहे.

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या मालिकेचं हे नाव जितकं भन्नाट आहे तितकीच भन्नाट आणि मजेशीर नावं या मालिकेतल्या पात्रांची आहेत. सोसायटी आणि सोसायटीतल्या पात्रांचा जगावेगळा स्वभाव प्रेक्षकांचं मनोरंजन करणार असून प्रत्येक पात्र म्हणजे एक नमुना आहे आणि ते साकारणारे कलाकारही तितकेच मजेशीर आणि अतरंगी आहेत. जसे की समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. ही दोन नावं उच्चारताच आता या मालिकेतून प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी मिळाली असेल ना… तर असे एकूण १६ अतरंगी कलाकार ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या कार्यक्रमामध्ये कल्ला करायला लवकरच तुमच्यासमोर हजर होणार आहेत.

View this post on Instagram

घरी बसलेल्यांकडून घरी बसलेल्यांसाठी नवी विनोदी मालिका 'आठशे खिडक्या नऊशे दारं' लवकरच सोनी मराठी वाहिनीवर ? @sonymarathi #आठशेखिडक्यानऊशेदारं । #AthasheKhidkyaNausheDar #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati #NewShow #NewSerial #MarathiSerials #LockdownSpecial #CoronaEffect #QuarantineFun #COVID19 #MarathiCelebs . . ————– . For interesting entertainment updates, follow the page right now – @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*.

A post shared by MarathiCelebs.com (@marathicelebs_com) on

मालिकेचं जेव्हा ऑन सेट शुटिंग होतं, तेव्हाच कित्येकदा तांत्रिक अडचणी येत असतात मग आता जेव्हा स्वतःच्या घरून शूट करण्याची वेळ येणार, तेव्हा  कलाकारांसाठी हे खूप आव्हानात्मक ठरणार आहे. तंत्रज्ञांच्या मदतीशिवाय मालिका शूट करणं तितकं सोपं नाही, पण केवळ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी कलाकार हे आव्हान आनंदानं आणि मेहनतीनं पूर्ण करणार आहेत आणि लवकरच एक नवी, मनोरंजक, हलकीफुलकी आणि खुसखुशीत मालिका ते सर्वांसमोर घेऊन येण्यासाठी सज्ज होताहेत.

सर्व कामांचं योग्य नियोजन करून, कलाकारांनी घरून शूट करणं आणि लॉकडाऊनमध्ये एक संपूर्ण नवी कोरी मालिका लाँच करणं हा टेलिव्हिजन क्षेत्रात होणारा पहिलाच आणि अनोखा उपक्रम असेल. हा उपक्रम राबविणं खरं तर खूपच आव्हानात्मक आहे, पण हे आव्हान सोनी मराठी वाहिनीनं अगदी लीलया पेललं आहे.

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ सोसायटीमधलं वातावरण नेमकं कसं असेल, ते पाहायचं आहे ना… मग नक्की पाहा १८ मेपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

Aathshe Khidkya Naushe Daara
सोनी मराठी, श्रीरंग गोडबोले आणि १४ कलाकार यांच्याकडून प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’