Home Movies शिवजयंतीला ‘ राजा शिवाजी ’ ची भव्य घोषणा | महाराष्ट्र दिनाच्या दिवशी...

शिवजयंतीला ‘ राजा शिवाजी ’ ची भव्य घोषणा | महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार प्रदर्शित

Riteish Deshmukh's Raja Shivaji Release Date

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी शिवजयंतीच्या खास निमित्ताने चाहत्यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. दोघांनीही त्यांच्या आगामी भव्य ऐतिहासिक चित्रपट ‘ राजा शिवाजी ‘ चं (Raja Shivaji) पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.Raja Shivaji

शिवजयंतीच्या दिवशी शेअर केलेल्या पोस्टमध्ये अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कॅप्शन देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेला सलाम करण्यात आला आहे. “आज तोच दिवस आहे, जेव्हा अंधाराला पहिल्यांदा प्रकाशाचं स्वप्न पडलं… जेव्हा इतिहासानं नव्या भविष्याकडे पाऊल उचललं… जेव्हा आपल्या मातीला मिळाला नवा स्वाभिमान…” अशा ओळींमधून या चित्रपटामागची भव्यता आणि भावना स्पष्टपणे दिसून येते.

हा ऐतिहासिक चित्रपट Jio Studios आणि Mumbai Film Company यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करत असून, ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने ते महाराजांची प्रेरणादायी गाथा एका अभूतपूर्व आणि भव्य सिनेमॅटिक रूपात प्रेक्षकांसमोर आणणार आहेत.

पोस्टमध्ये “आपला राजा… आपला अभिमान…” अशा शब्दांत चित्रपटाबद्दलचा अभिमान व्यक्त करण्यात आला आहे. शिवजयंतीच्या पावन दिवशी या चित्रपटाचं पोस्टर समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये आणि शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी चित्रपटासाठी आतापासूनच उत्सुकता व्यक्त केली आहे.

चित्रपटात रितेश देशमुख यांच्या व्यतिरिक्त जेनेलिया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, फरदीन खान, महेश मांजरेकर, भाग्यश्री सारख्या अनेक दिग्गज कलाकारांची फौज दिसणार असल्याचे संकेत पोस्टमधून मिळाले आहेत. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ हा केवळ एक चित्रपट नसून, तो इतिहास, शौर्य आणि स्वाभिमानाचा भव्य अनुभव ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर आपल्या राजाची ही भव्य गाथा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. जय शिवराय!

Raja Shivaji Poster Riteish Deshmukh's Raja Shivaji Release Date

 

Riteish Deshmukh’s Raja Shivaji Movie To Release On 1st May 2026.

https://marathicelebs.com/raja-shivaji-riteish-deshmukh/

https://marathicelebs.com/raja-shivaji-teaser-premiere-in-bigg-boss-marathi-6/

Raja Shivaji IMDB Page

Keywords: Raja Shivaji movie, Raja Shivaji release date 1 May 2026, Riteish Deshmukh upcoming movie, Genelia Deshmukh new film, Chhatrapati Shivaji Maharaj movie, राजा शिवाजी चित्रपट, शिवाजी महाराजांवरील चित्रपट, मराठी ऐतिहासिक चित्रपट 2026