महाशिवरात्रीला घडणार शिवस्वरूपाचे भव्य दर्शन !
१५ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वा. आई तुळजाभवानी आणि १६ फेब्रुवारी संध्याकाळी ०७:३० वा. ‘जय जय स्वामी समर्थ
यंदाची महाशिवरात्र मराठी प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. कलर्स मराठी वाहिनी आपल्या लोकप्रिय मालिकांमधून शिवतत्त्वाची दिव्य अनुभूती देणारे दोन भव्य विशेष भाग घेऊन येत आहे. ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकांमधील महाशिवरात्री विशेष भाग प्रेक्षकांना आध्यात्मिक आणि दृश्यरम्य अनुभव दे
णार आहेत.
महाशिवरात्री निमित्त तयार करण्यात आलेल्या या विशेष भागांमध्ये शिवस्वरूपाचे भव्य दर्शन आणि त्यामागील आध्यात्मिक संकेत उलगडले जाणार आहेत. तुळजाई आणि यमाई यांच्या नात्याचा गूढ संदर्भ, तसेच शिवतत्त्वाशी जोडलेली कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा महाशिवरात्री विशेष भाग येत्या १५ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे. या भागात ‘जे पिंडी ते ब्रह्मांडी’ या सिद्धांताची उकल करत महादेवांचे विराट ब्रह्मांडरूप दाखवले जाणार आहे. देवी यमाई आणि आई तुळजाभवानी यांच्या कथेचा महत्त्वपूर्ण संदर्भ या विशेष भागातून समोर येणार असून, भक्तिमय वातावरणात शिवतत्त्वाचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. 
तसेच ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ७:३० वाजता महाशिवरात्री विशेष भाग प्रसारित होईल. सुमारे २६ मिनिटांच्या या भागात स्वामी चरित्रातील महत्त्वाची व्यक्तिरेखा भाऊसाहेब जहागीरदार यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग दाखवण्यात येणार आहे. शिवतांडव स्तोत्राच्या गजरात स्वामींच्या हृदयातून एकामागोमाग बारा ज्योतिर्लिंग प्रकट होण्याचा भव्य प्रसंग या भागाचे आकर्षण ठरणार आहे.
शिवस्वरूपाचे दर्शन, भक्ती आणि आध्यात्मिक संकेतांनी परिपूर्ण असे हे विशेष भाग यंदाची महाशिवरात्र अधिक संस्मरणीय करतील. त्यामुळे ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय जय स्वामी समर्थ’चे महाशिवरात्री विशेष भाग नक्की पाहा, फक्त आपल्या कलर्स मराठीवर.
Mahashivratri special episodes of Aai Tuljabhavani and Jai Jai Swami Samarth will telecast on Colors Marathi on 15 and 16 February 2026.









