बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये रंगणार महेश मांजरेकर यांच्यासोबत WEEKEND चा डाव

Bigg Boss Marathi Weekend Cha Daav
बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये रंगणार महेश मांजरेकर यांच्यासोबत WEEKEND चा डाव

बिग बॉस मराठी सिझन २ च्या सदस्यांनी पहिल्या दिवसापासून घर गाजवलं… मग त्यांचे भांडण असो वा वाद असो वा घरामध्ये झालेले टास्क असो सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे… अभिजित बिचुकले यांचे सदस्यांशी झालेले वाद, परागचे शिवानी, विणा, अभिजित केळकर यांच्याशी झालेले भांडण, शिवानीचा विणा आणि शिव बरोबर झालेला वाद, पराग आणि वैशाली म्हाडेमध्ये टास्क दरम्यान उडालेली वादाची ठिणगी, पहिली नॉमिनेशन प्रक्रिया, पहिला कॅप्टन कोण होईल याबद्दलची उत्सुकता तर अभिजित बिचुकले यांचे रडणे, सवाल ऐरणीचा या टास्क दरम्यान अभिजित केळकर आणि रुपाली भोसले यांचे भावूक होणे वा याच टास्क दरम्यान विद्याधर जोशी – सुरेखा पुणेकर तर अभिजित केळकर – किशोरी शहाणे यांचा डान्स सगळ्याच घटनांनी चर्चेला उधाण आले.

घरात रंगलेली अंताक्षरी असो वा डान्स असो किंवा दिगंबर नाईक यांनी सादर केलेली सुंदर कविता… बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला सिझन धडाक्यात सुरु झाला आणि बघता बघता पहिला आठवडा संपत देखील आला… आता वेळ आली आहे या घरातील सदस्यांनी केलेल्या वर्तणुकीचा, कामाचा आढावा घेण्याची… हा आठवडा कसा गेला ? कोण चुकलं ? कोण बरोबर होत ? जे चुकले त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि जे अजूनही घरामध्ये असून नसल्यासारखे आहेत त्यांना जाग करण्याची…

म्हणजेच वेळ आली आहे WEEKEND चा डावची जो रंगणार आहे महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi Weekend Cha Daav
बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये रंगणार महेश मांजरेकर यांच्यासोबत WEEKEND चा डाव