लग्नगाठ मोडण्याचा गोपिकाबाईंचा डाव यशस्वी होईल ?

Swamini Colors Marathi
लग्नगाठ मोडण्याचा गोपिकाबाईंचा डाव यशस्वी होईल ?

“स्वामिनी सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर”

कलर्स मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या “स्वामिनी मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता आहे… सत्ता आणि संसार, कौटुंबिक कलह, कटकारस्थानं, राजकारणी डावपेच याबरोबरच एका सामान्य मुलीचा राजकन्या बनण्यापर्यंतचा प्रवास या मालिकेमध्ये दाखविला जात आहे… रमाची भुमिका साकारणारी सृष्टी पगारे आणि अत्यंत कठोर, धोरणी गोपिकाबाईंची भुमिका साकारणार्‍या ऐश्वर्या नारकर यांचा अभिनय प्रेक्षकांची मने जिंकत आहे… पेशवाईचा काळ आणि त्याचं देखणं रूप या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे… त्याकाळातील पोशाख, दाग – दागिने, बोलण्याची – वागण्याची पध्दत खूप बारकाईने मालिकेमध्ये दाखविली जात आहे. तर दुरीकडे मालिकेचे शीर्षकगीत, त्यातील शब्द प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. सध्या मालिकेमध्ये नानासाहेब यांचा मुलगा माधवच्या लग्नाची तयारी आणि त्याच्यासाठी योग्य अशी मुलगी शोधण्याचा प्रयत्न सुरू होता आणि यासाठीच बाळशास्त्री यांनी सुचवलेल्या रमाच्या स्थळाला गोपिकाबाईंचा विरोध आहे. माधवरावांना तर लग्न करायचे नाहीये… यामध्ये पत्रिकेची अदलाबदली होते. पार्वतीबाई आणि सदाशिवराव रमाच्या घरी येऊन पोहचतात आणि माधवरावांसाठी रमाच्या बहिणीचा म्हणजेच गंगाचा हात मागतात. यामुळे भामिनी, रमाचे आई वडील मात्र खूप खुश होतात… पण अजून ते या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत की, हा निव्वळ एक गैरसमज आहे… हे एकीकडे होत असताना दुसरीकडे गोपिकाबाई माधवरावांची रमाशी जुळलेली लग्नगाठ मोडण्याच्या प्रयत्नात आहेत…. पण नियतीच्या मनामध्ये काही वेगळेच आहे…

मालिकेमध्ये पुढे काय होईल ? रमा आणि माधव यांचे लग्न मोडण्यासाठी गोपिकाबाई कोणता नवा डाव रचतील ? त्या यशस्वी होतील ? की नानासाहेब यांच्या म्हणण्यानुसार माधवराव रमाशी लग्न करण्यास होकार देतील ? हे कळेलच… तेंव्हा नक्की पहा स्वामिनी, सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर.

 

Swamini Colors Marathi
लग्नगाठ मोडण्याचा गोपिकाबाईंचा डाव यशस्वी होईल ?

Swamini Colors Marathi's Upcoming SerialSwamini Colors Marathi's Upcoming Serial