स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवे एपिसोड्स १३ जुलैपासून भेटीला

Star Pravah Is Back With New Episodes
स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे नवे एपिसोड्स १३ जुलैपासून भेटीला

रिपीट्स बंद, १३ जुलैपासून ओरिजनल सुरु

कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिकांचं चित्रीकरण बंद होतं त्यामुळे सर्वच वाहिन्यांवर मालिकांचं पुन:प्रक्षेपण सुरु झालं. मात्र आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येत आहे. सरकारने दिलेल्या सर्व अटी-शर्थींचं पालन करुन आणि सेटवर आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्टार प्रवाहवरील मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि आता १३ जुलैपासून नव्या भागांसह स्टार प्रवाहवरील तुमच्या आवडत्या मालिका भेटीला येणार आहेत. मनोरंजनाने परिपूर्ण आणि तितकेच उत्कंठावर्धक एपिसोड्स घेऊन स्टार प्रवाहवरील मालिका सज्ज आहेत. आपल्या आवडत्या मालिका पहाण्यासाठी प्रेक्षक जितके उत्सुक आहेत तितकीच उत्सुक आहेत कलाकार मंडळी.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाची व्यक्तिरेखा साकारणारी रेश्मा शिंदे म्हणाली, ‘आमच्या मालिकेचा पहिला एपिसोड जेव्हा ऑनएअर गेला तेव्हा मनात जेवढी धाकधूक होती तिच धाकधूक आताही आहे. कार्तिक – दीपाच्या लग्नसोहळ्यावर मालिका येऊन थांबली होती त्यामुळे यापुढील भाग खूपच उत्कंठावर्धक असतील. दीपाच्या आयुष्यात ज्याप्रमाणे नवं पर्व सुरु होत आहे त्याप्रमाणेच माझ्याही आयुष्यात नवं पर्व सुरु होत आहे. दररोज रात्री आठ वाजता ‘रंग माझा वेगळा’ मालिका लवकरच पाहायला मिळणार आहे तेव्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी मी प्रचंड उत्सुक आहे असं रेश्मा म्हणाली.

तेव्हा स्टार प्रवाहवर तुमच्या आवडत्या मालिका आणि पात्रांना भेटण्यासाठी सज्ज व्हा. १३ जुलैपासून फक्त स्टार प्रवाहवर.

 

Star Pravah Is Back With New Episodes