सिंगिंग स्टारमध्ये रंगणार सुपरहीट डुएट स्पेशल

या आठवड्यात सिंगिंग स्टारमध्ये सुपरहीट डुएट स्पेशल हा विशेष भाग होणार आहे. यामध्ये स्पर्धक आणि मेंटॉर दोघं मिळून गाण्यांचं सादरीकरण करणार आहेत. या आठवड्याचे प्रोमोज बघून हा भाग धमाल असणार आहे, हे प्रेक्षकांना कळलं आहे. अंशुमन आणि जुईली ‘हृदयी वसंत फुलताना’ हे सदाबहार डुएट सादर करणार आहेत. ‘हील हील पोरी हिला’ हे गाणं गिरिजा आणि ऋषिकेश सादर करणार आहेत. यशोमान आणि शरयू ‘मन धागा धागा’ हे रोमँटिक गाणं सादर करणार आहेत.
२-३ ऑक्टोबरला रात्री ९ वा. हा सुपरहीट डुएट स्पेशल भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पाहायला विसरू नका सिंगिंग स्टार शुक्र.-शनि., रात्री ९ वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 

Singing Star Duet Special