स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एंट्री

Sharmishtha Raut In Mulgi Zali Ho

स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेचं कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं असून मालिकेत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एंट्री झाली आहे. शर्मिष्ठा नीलिमा सावंत ही व्यक्तिरेखा साकारत असून नीलिमाच्या येण्याने मालिकेत नवं वळण आलं आहे. माऊने सिद्धांत सोबत लग्नासाठी नकार दिला असून लग्न करेन तर शौनकशी असं ठामपणे सांगितलं आहे. माऊने जरी लग्नासाठी नकार दिला असला तरी सिद्धांत हार मानायला तयार नाही. नीलिमाचा वापर करुन तो माऊचे वडिल म्हणजेच विलास पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.

सिद्धांत आणि नीलिमाचा डाव यशस्वी होणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेलच. पण नीलिमा सावंत या भूमिकेच्या निमित्ताने शर्मिष्ठाचा नवा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका मुलगी झाली हो रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Sharmishtha Raut In Mulgi Zali Ho Sharmishtha Raut In Mulgi Zali Ho Sharmishtha Raut In Mulgi Zali Ho Sharmishtha Raut In Mulgi Zali Ho Sharmishtha Raut In Mulgi Zali Ho