गणेशोत्सवाच्या जल्लोषात स्टार प्रवाहवर मनोरंजनाचा महारविवार

Sanskruti Kaladarpan
गणेशोत्सवाच्या जल्लोषात स्टार प्रवाहवर मनोरंजनाचा महारविवार

“संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळ्याचा प्रेक्षकांसाठी खास नजराणा”

अर्चना नेवरेकर फाऊंडेशन आणि स्टार प्रवाह प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या वातावरणात हा रंगारंग सोहळा प्रेक्षकांना पहाता येणार आहे. या सोहळ्यात पुरस्कारांच्या आतिषबाजी सोबतच वैदेही परशुरामी, मानसी नाईक, तृप्ती तोरडमल, माधवी निमकर, केतकी चितळे, मयुरेश पेम, केतकी पालव आणि ेघा धाडेच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्ससने अनोखी रंगत आणली. संस्कृतीची ओळख दिमाखात मिरवत कलेचं कौतुक करणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. पुष्कर श्रोत्री, हेमांगी कवी, सुहास परांजपे या विनोदवीरांनी आपल्या खुमासदार विनोदांनी सोहळ्यात धमाल उडवून दिली. हा जल्लोषपूर्ण सोहळा रविवार ८ सप्टेंबरला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर प्रक्षेपित होणार आहे.

अस्सल मराठी बाणा, आनंदाचा नजराणा म्हणजेच संस्कृती कलादर्पण. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना कलागौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर स्टार प्रवाहची ‘छत्रीवाली‘ ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांनी संस्कृती कलादर्पण सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हा मनोरंजनाने परिपूर्ण असा हा सोहळा पाहायला विसरु नका रविवार ८ सप्टेंबरला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर.

 

 

Sanskruti KaladarpanSanskruti KaladarpanSanskruti KaladarpanSanskruti KaladarpanSanskruti KaladarpanSanskruti KaladarpanSanskruti KaladarpanSanskruti Kaladarpan