सचिनच्या चाहत्यांसाठी, सचिनच्या वाढदिवसाची सोनी मराठी वाहिनी कडून भेट

Sachin A Billion Dreams On Sony Marathi And Sony Max
सोनी मराठी वाहिनीची मास्टर ब्लास्टरला सलामी

सचिन तेंडुलकर बर्थडे स्पेशल – ‘सचिन द बिलियन ड्रीम्स’ सोनी मराठी वाहिनीवर

सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील वंडर बॉय आहे. खूप लहान असल्यापासून त्याने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि अख्या जगाला त्याचं वेड लागलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेक विश्व विक्रम केलेले आहेत. सचिन फिल्ड वर खेळायला आला की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन त्याची खेळी पाहतात.

तर अशा या सर्वांच्या लाडक्या सचिनच्या वाढदिवसानिमित्त सोनी मराठी वाहिनीने त्याला एक अनोखी सलामी देत ‘सचिन द बिलियन ड्रीम्स‘ या चित्रपटाचं प्रक्षेपण 24 एप्रिलला दुपारी 3 वाजता ठेवलं आहे. तमाम सचिन प्रेमी आणि क्रिकेट प्रेमींसाठी हा सिनेमा म्हणजे एक पर्वणीच आहे. सचिनचा आतापर्यंतचा प्रवास या चित्रपटात उलगडला आहे. सोनी मराठी वाहिनी बरोबरच सोनी मॅक्स वाहिनीवर देखील हा चित्रपट 24 एप्रिल, दुपारी 3 वा. प्रदर्शित होईल.

तर मग पाहायला विसरू नका सचिन द बिलियन ड्रीम्स, शुक्रवार 24 एप्रिलला दुपारी 3 वाजता सोनी मराठी आणि सोनी मॅक्स वाहिनीवर.

 

Sachin A Billion Dreams On Sony Marathi And Sony Max
सोनी मराठी वाहिनीची मास्टर ब्लास्टरला सलामी