बिग बॉस मराठीच्या घरात आता ‘ड्रामाक्वीन’च्या स्टाईलने होणार ठणाणा

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘ड्रामाक्वीन’ची एन्ट्री; आता घरात ‘ड्रामाक्वीन’च्या स्टाईलने होणार ठणाणा


बिग बॉस मराठी दिवस 63 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहेत. यंदाच्या सीझनमध्ये सेलिब्रिटींपासून नेत्यांपर्यंत आणि गायकांपासून सोशल मीडिया एन्फ्लुएंसर्स सामील झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात एकापेक्षा एक सदस्य पाहायला मिळत आहेत. आता या सदस्यांना भेटायला त्यांना खास सल्ले द्यायला ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एक खास पाहुणी येणार आहे. ड्रामाक्वीन राखी सावंतची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री होणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की,”राखी सावंतने हॅलो बिग बॉस म्हणत बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेतली आहे. बिग बॉसला राखी म्हणतेय,”मी राखी सावंत तुमची पहिली बायको”. त्यानंतर निक्कीला राखी म्हणतेय,”सस्ती राखी सावंत. आता घरात चालणार माझंच ठणाणा…निक्की तांबोळी सोडून येणार तुला अंबोली”.

राखीला पाहताच निक्कीचा चेहरा बघण्यासारखा झाला आहे. निक्की बोलण्यात कोणाला ऐकत नाही. त्यामुळे आता राखी सावंतला ती कसं गप्प करणार हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. तसेच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंत आज तिच्या स्टाईलने जबरदस्त कल्ला करताना दिसणार आहे.

पाहत रहा ‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही विनामूल्य @officialjiocinema वर.

#ColorsMarathi #BIGGBOSSMarathi #JioCinema #BBM