संजू – रणजीत पुन्हा नव्या संकटात… राजा रानीची गं जोडी | कलर्स मराठी

Raja Ranichi Ga Jodi

कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न !

ढालेपाटीलांच्या घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातला माहोल ताणतणावाचा झाला आहे. अपर्णाच्या स्वभावाचा त्रास सगळ्यांना होऊ लागला असून सुजित सोबतच घरातील सगळ्यांच्या डोक्यावर येऊन ती बसली. तरीदेखील संजू – रणजीत त्यामधून मार्ग काढत आहेत. अपर्णाच्या धमक्या काही कमी होत नाहीये तर दुसरीकडे पंजाबराव, राजश्री आणि दादासाहेब यांची कटकारस्थानं काही थांबत नाहीयेत. दादासाहेब – राजश्री देखील काहीतरी कटकारस्थान करत आहेत यावर संजूला संशय आहे ?  संजू – रणजीत समोर नवीन संकटी उभी रहातात, ढाले  – पाटील कुटुंबाविरोधात कटकारस्थान रचली जातात पण आजवर संजूने खंबीरपणे रणजीतच्या साथीने त्यावर मात केली आहे. अपर्णाच्या वागणुकीने आता तिचाच घात तर नाही ना होणार ? असं कुठेतरी वाटू लागलं आहे. अपर्णा राजश्रीला पैसे मागणार असून ते कुसुमावती आणि संजूला कळणार आहे. यावर उपाय म्हणून कुसुमावती संजूला सांगणार आहे मी बघते अपर्णाचं काय करायचे. दुसरीकडे मोना आणि अपर्णामध्ये बाचाबाची होणार आहे. ज्यामध्ये अपर्णा मोनाला खूप काही सुनावणार आहे. मोना रागाने अपर्णाला कानाखाली मारणार आहे. ज्यानंतर अपर्णा सुजितला धमकावणार आहे. हे सगळं झाल्यानंतर एकीकडे आईसाहेब आणि दुसरीकडे सुजित अपर्णाला भेटायला निघणार आहेत. पण, जेव्हा संजू – रणजीत पोहचतात तेव्हा अपर्णाचा मृत्यू झालेला दोघांना दिसणार आहे.

Raja Ranichi Ga Jodi

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे अपर्णा कुसुमावती यांना धमकी देते आहे आता त्याचे परिणाम तिला भोगावे लागणार ? कुसुमावती अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार ?  सुजित अपर्णाला काय सांगणार ? कोणावर येणार अपर्णाच्या खुनाचा संशय ? जाणून घेण्यासाठी बघा राजा रानीची गं जोडी सोम ते शनि संध्या ७.०० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

 

Raja Ranichi Ga Jodi Raja Ranichi Ga Jodi Raja Ranichi Ga Jodi Raja Ranichi Ga Jodi Raja Ranichi Ga Jodi