गेल्या १२-१५ वर्षात मराठी चित्रपटसृष्टी ने पुन्हा एकदा दर्जा, प्रेक्षकांचं प्रेम आणि व्यावसायिक यश ह्या सर्व पातळ्यांवर सोन्याचे दिवस अनुभवायला सुरुवात केली आहे. आणि त्यातलं सातत्य कायम आहे. आणि त्यांची संख्या ही लक्षणीय आहे. अशा वेळी एका वर्षात १०० हून अधिक चित्रपट प्रदर्शित होणं हे नवीन नाही. त्यामुळे एका दिवशी दोन किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित होणं यात काही नवीन नाही.
जितकं जास्त काम वाढलंय तितके जास्त कलाकार आणि तंत्रज्ञ उदयाला यायला लागले आहेत. त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे गीतकार मंदार चोळकर.
चित्रपट, नाटक, मालिका सर्वच क्षेत्रात कमी काळात उल्लेखनीय काम करणारं हे नाव. दर्जा आणि संख्या ह्या दोन्हीचं संतुलन राखत मंदार ने आजवर १४५ पेक्षा अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे. त्यात प्रामुख्याने दुनियादारी, सतरंगी रे, कट्यार काळजात घुसली, क्लासमेट्स, मितवा, तालीम, कान्हा, गर्ल्स, बॉईझ २, ठाकरे, बकेट लिस्ट, विजेता, सरकार ३, सीतारामम, दे धक्का २, ट्रिपल सीट, हर हर महादेव, सरी, फुलराणी, अफलातून इत्यादी चित्रपटातील गाण्यांचा उल्लेख करावाच लागेल. त्यात भर घालायला मंदारची गाणी असलेले अजून दोन चित्रपट ‘एकदा येऊन तर बघा’ आणि ‘लंडन मिसळ’ एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.
दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलर्सना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे आणि त्यातल्या लंडन मिसळ, भागाबाई, अय्यो, मस्तीची सफर गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. आज वर १२५ संगीतकारांबरोबर काम केलेल्या मंदारच्या ह्या गाण्यांचे संगीतकार आहेत वैशाली सामंत, रोहन – रोहन आणि कश्यप सोमपुरा.
येत्या ८ डिसेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ह्या
दोन्ही चित्रपटांना खूप खूप शुभेच्छा !