अनुभवा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ यांची अलौकिक भेट – गाथा नवनाथांची मालिकेचे २०० भाग पूर्ण !

Gaatha Navnathanchi

गाथा नवनाथांची या मालिकेद्वारे सोनी मराठी वाहिनीने नवनाथांची गाथा प्रेक्षकांसमोर आणली आणि  प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.

या मालिकेत आत्तापर्यंत नाथांच्या चार अवतारांची गोष्ट सांगितली गेली आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, जालंदरनाथ आणि गहिनीनाथ या नाथांच्या आत्तापर्यंत  दृश्यस्वरूपात न बघितलेल्या गोष्टी प्रेक्षकांनी अनुभवल्या.

या मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले असून नवनाथांचा अद्भुत महिमा प्रेक्षकांना या मालिकेतून  पाहता आला आहे.

गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ यांच्या गुरुशिष्याच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्या नात्याला पुढे घेऊन जात आता गोरक्षनाथ त्यांच्या हातून अवतार घेतलेल्या गहिनीला दीक्षा देणार आहेत. मैनावतीच्या राज्यात अडकलेल्या आपल्या गुरूपर्यंत गोरक्षनाथ कसे पोचणार, तिच्या तावडीतून ते आपल्या गुरूला बाहेर काढून जगत्कल्याणाच्या कार्याला दिशा देऊ शकतील का, हे येत्या काही भागांत पाहायला मिळणार आहे.

हत्तीच्या कानातून प्रकट झालेल्या कानिफनाथ यांची आणि मच्छिन्द्रनाथ आणि मैनावतीचे सुपुत्र मीननाथ यांची गोष्ट पुढील भागांत प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

पाहा, गाथा नवनाथांची. सोम.-रवि. संध्या ६:३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

 

Gaatha Navnathanchi